अमेरिका–इराण संघर्ष । ५.०२ । विविध स्त्रोतांच्या माहितीवर आधारित वृत्त :
(war) मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा “जवळपास अमर्याद साठा” असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे इराणच्या संरक्षण मंत्रालयानेही “दीर्घकाळ युद्ध करण्याची क्षमता” असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र युद्धाचा निकाल केवळ शस्त्रसाठ्यावर ठरत नाही. सैनिकांची संख्या, उत्पादन क्षमता, अर्थव्यवस्था, हवाई वर्चस्व आणि तंत्रज्ञान यासारखे अनेक घटक युद्धाच्या परिणामावर प्रभाव टाकतात.
⚔️ संघर्षाची सुरुवातच तीव्र
(war) इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या सुरुवातीपासूनच हल्ल्यांची गती खूप वेगाने वाढली आहे.
तेल अवीव येथील “इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज (INSS)” च्या अंदाजानुसार, अमेरिका आणि इस्रायलने आतापर्यंत २,००० पेक्षा अधिक हल्ले केले. इराणने ५७१ क्षेपणास्त्रे आणि १,३९१ ड्रोन डागले. यातील अनेक क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले दीर्घकाळ चालू ठेवणे दोन्ही बाजूंना कठीण ठरू शकते.
🚀 इराणची क्षेपणास्त्र शक्ती
(war) पाश्चिमात्य देशांच्या अधिकाऱ्यांच्या मते, युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत इराणने शेकडो क्षेपणास्त्रे डागली होती. परंतु आता हा आकडा दर्जनांपर्यंत कमी झाला आहे.
युद्धापूर्वी अंदाज होता की, इराणकडे २००० पेक्षा जास्त कमी अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे. हजारो “शाहेद” वन-वे अटॅक ड्रोन तयार आहेत.
अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी कमांडर जनरल डॅन केन यांच्या मते पहिल्या दिवसाच्या तुलनेत इराणच्या मिसाइल लॉन्चिंगमध्ये ८६% घट झाली. ड्रोन हल्ल्यांमध्ये ७३% घट झाली. याचा अर्थ इराणला हल्ल्यांची गती कायम ठेवण्यात अडचणी येत असाव्यात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते इराण आपला साठा वाचवण्यासाठी हल्ले कमी करत असू शकतो.
✈️ अमेरिका–इस्रायलचे हवाई वर्चस्व
(war) अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठे नुकसान केले आहे.
इराणची वायु संरक्षण प्रणाली मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली.
त्याची वायुसेना प्रभावी राहिलेली नाही.
आता अमेरिकेचे लक्ष्य मिसाइल लॉन्चर , ड्रोन बेस , शस्त्रसाठे, उत्पादन कारखाने यांना नष्ट करणे आहे.
मात्र इराणचे क्षेत्रफळ फ्रान्सपेक्षा जवळपास तीनपट मोठे असल्याने सर्व शस्त्रसाठे नष्ट करणे सोपे नाही.
🇺🇸 अमेरिकेची लष्करी ताकद
(war) अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. आधुनिक आणि अचूक मार्गदर्शित शस्त्रास्त्रांचा मोठा साठा अमेरिकेकडे आहे. मात्र ही शस्त्रे अत्यंत महागडी असतात
त्यांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होते, म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संरक्षण कंपन्यांची बैठक बोलावून शस्त्रनिर्मिती वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
💣 महागड्या शस्त्रांची समस्या
(war) अमेरिकेने सुरुवातीला टॉमहॉक क्रूझ मिसाइल सारख्या महागड्या शस्त्रांचा वापर केला.
आता मात्र अमेरिकन वायुसेना तुलनेने कमी खर्चिक JDAM बॉम्ब वापरत आहे.
CSIS (Center for Strategic and International Studies) चे तज्ज्ञ मार्क कॅन्सियन यांच्या मते:
अमेरिकेकडे दहा हजारांहून अधिक JDAM बॉम्ब आहेत
परंतु एअर डिफेन्स मिसाइल्स मर्यादित आहेत.
🛡️ पैट्रियट मिसाइल्सचा मर्यादित साठा
(war) इराणच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी अमेरिकेला पैट्रियट इंटरसेप्टर मिसाइल्स वापरावी लागतात.
एका मिसाइलची किंमत ४० लाख डॉलरपेक्षा जास्त
अमेरिका दरवर्षी सुमारे ७०० मिसाइल्स तयार करते.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अमेरिकेकडे सुमारे १,६०० पैट्रियट मिसाइल्सचा साठा असू शकतो.
जर इराण सतत मिसाइल हल्ले करत राहिला तर हा साठा लवकर कमी होऊ शकतो.
⏳ दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाचे समीकरण
(war) लष्करी तज्ज्ञांच्या मते, अमेरिका दीर्घकाळ हवाई हल्ले करू शकते. मात्र एअर डिफेन्स युद्ध अनिश्चित राहू शकते. युद्ध लांबत गेल्यास लक्ष्यांची संख्या कमी होत जाते. हल्ल्यांची गतीही हळूहळू कमी होते.
🌎 निष्कर्ष
सध्याच्या परिस्थितीत अमेरिका तांत्रिक आणि लष्करी दृष्ट्या वरचढ दिसत असली तरी इराणकडेही दीर्घकालीन प्रतिकार करण्याची क्षमता आहे.
इतिहास सांगतो की,
केवळ बॉम्बहल्ल्यांनी युद्ध पूर्णपणे जिंकता येत नाही.
गाझामध्ये हमास किंवा येमेनमधील हूती गट अजूनही टिकून आहेत. म्हणून अमेरिका–इराण संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
📌 माहिती स्त्रोत – Institute for National Security Studies (INSS), तेल अवीव / U.S. Central Command (CENTCOM)/ Center for Strategic and International Studies (CSIS)/ आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषकांचे अहवाल