अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी Train, Learn and Earn Program परीक्षेत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ICAI अंतर्गत TEL परीक्षेत ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून वाणिज्य विभागासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्यांनी आपल्या मनोगतात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर प्राध्यापकांचे कौतुक केले. प्रसंगी उपप्राचार्य प्रा. मिलिंद देशपांडे तसेच प्रबंधक मा. अशोक असेरी CA अभय कटारिया आणि CA प्रसाद पुराणिक उपस्थित होते.
तसेच हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव श्री . संजय जोशी, कार्याध्यक्ष व वरिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन डॉ. रमेश झरकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून तिच्या भावी कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विद्यार्थ्यांना डॉ.प्रिया सारडा, प्रा. वीरेंद्र पाटील, प्रा. ओंकार भिंगारदिवे, प्रा.साक्षी अरोरा, प्रा.वरद हातवळणे आदी वाणिज्य शाखेतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले.
याप्रसंगी निर्गुना गायकवाड आणि यश भालोडी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव तोडमल यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. वरद हातवळणे यांनी केले .