अहिल्यानगर जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम : ९ मार्चपासून मोहिमेला सुरुवात; ८ जूनपर्यंत पात्र मुलींना ‘गार्डासिल-४’ लसीचा एकच डोस

अहिल्यानगर । राजेंद्र देवढे | नगरी नगरी  : (HPV) जिल्ह्यातील मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ९…
1 Min Read 0 271

अहिल्यानगर । राजेंद्र देवढे | नगरी नगरी  :
(HPV) जिल्ह्यातील मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ९ मार्च २०२६ ते ८ जून २०२६ या कालावधीत १४ वर्षे पूर्ण केलेल्या व १५ वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींसाठी एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेची राष्ट्रीय स्तरावरील सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
( HPV ) या लसीकरणामुळे महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक टक्का मुली या मोहिमेचा लाभ घेतील, असा अंदाज असून त्यांना गार्डासिल-४ या लसीचा एकच डोस देण्यात येणार आहे. ही लस ०.५ मिली इतकी डाव्या दंडाच्या वरच्या भागात स्नायूमध्ये दिली जाणार आहे.
(HPV) लसीकरण सत्र सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार असून सर्व पात्र लाभार्थी आणि देण्यात आलेल्या लसीची नोंद यू-विन पोर्टलवर करण्यात येणार आहे. लसीकरणापूर्वी मुलगी उपाशी पोटी नसल्याची खात्री पालकांनी करावी, तसेच लस देण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची तपासणी केली जाणार आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून लस घेतल्यानंतर लाभार्थीला ३० मिनिटे केंद्रावर थांबविण्यात येईल.

आरोग्य विभागाने नागरिकांना समाजमाध्यमांवर पसरविल्या जाणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. मध्यम किंवा तीव्र आजार असलेल्या मुलींना त्या पूर्णपणे बऱ्या होईपर्यंत लस दिली जाणार नाही. तसेच मागील लसीकरणामुळे अ‍ॅलर्जी झालेल्या किंवा यीस्टची अ‍ॅलर्जी असलेल्या मुलींनाही ही लस दिली जाणार नाही. अपेक्षित वयोगटाबाहेरील किंवा यापूर्वी एचपीव्ही लस घेतलेल्या मुलींनाही या मोहिमेत लस देण्यात येणार नाही.

(HPV) या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून गावपातळीवरील आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content