अहिल्यानगर मनपा समित्यांची घोषणा स्थायी व महिला-बालकल्याण समिती सदस्यांची निवड जाहीर; सर्व पक्षांना प्रतिनिधित्व

अहिल्यानगर | २६.०२ । नगरी नगरी : अहिल्यानगर महानगरपालिका च्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व महिला-बालकल्याण…
1 Min Read 0 318

अहिल्यानगर | २६.०२ । नगरी नगरी :

अहिल्यानगर महानगरपालिका च्या सर्वसाधारण सभेत आज (दि. 26 फेब्रुवारी) स्थायी समिती व महिला-बालकल्याण समिती सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात पार पडलेल्या सभेला महापौर ज्योती गाडे अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्त यशवंत डांगे तसेच उपमहापौर धनंजय जाधव उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षांच्या गटनेत्यांनी बंद पाकिटातून सदस्यांची नावे महापौरांकडे सुपूर्द केली. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली.

🔹 स्थायी समिती सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट):

गौरी बोरकर, सुरेश बनसोडे, हरप्रीत कौर गंभीर, संध्या पवार, मीना चोपडा, पौर्णिमा गव्हाळे

भाजप:

सुभाष लोंढे, बाबासाहेब वाकळे, निखिल वारे, मनोज दुल्लम, मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे

शिंदे सेना:

नवनाथ कातोरे, सुनिता गेनप्पा

काँग्रेस:

खान मीनाज जाफर

एमआयएम:

शेख शहनाज खालिद

🔹 महिला-बालकल्याण समिती सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेस:

दिपाली बारस्कर, सुनिता भिंगारदिवे, अनिता शेट्टीया, काजल भोसले, सुनिता कांबळे, अश्विनी लोंढे

भाजप:

वंदना ताठे, शितल ढोणे, पुष्पा बोरुडे, आशाबाई कातोरे, रोशनी त्रिंबके, वर्षा सानप

शिंदे सेना:

मंगल लोखंडे, रूपाली दातरंगे

काँग्रेस:

खान मीनाज जाफर

एमआयएम:

शेख शहनाज खालिद

🔹 यांची लागली स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी

राष्ट्रवादी काँग्रेस:

विकी जगताप, रेवणनाथ पवार, बाबुशेठ नागरगोजे

भाजप:

विशाल नाकाडे, रवींद्र बारस्कर

शिंदे सेना:

आदेश सुरज जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती; मात्र आवश्यक कागदपत्रे अपुरी असल्याने त्यांची निवड रद्द करण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. संबंधित कोटा शिंदेसेनेचाच असल्याने पुढील सभेत नव्या सदस्याची निवड केली जाणार आहे.

⚖️ राजकीय समतोल साधला

या निवडीमुळे मनपा समित्यांमध्ये सर्व प्रमुख पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना यांच्यासह काँग्रेस आणि एमआयएमलाही स्थान मिळाल्याने राजकीय समतोल साधल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अहिल्यानगर मनपातील आगामी धोरणात्मक निर्णयांमध्ये या नव्या समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 🏛️

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content