पुणे । २१.०२ । नगरी नगरी :
प्रसार भारती – भारताची लोकसेवा प्रसारक संस्था अंतर्गत आकाशवाणी, पुणे (All India Radio Pune) येथे ‘न्यूज रीडर-कम-ट्रान्सलेटर’ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी निर्धारित अटींनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
🎓 शैक्षणिक पात्रता व अनुभव
या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. पत्रकारितेतील डिप्लोमा किंवा पदव्युत्तर डिप्लोमा, अथवा मुद्रित/इलेक्ट्रॉनिक माध्यमातील किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांवर प्रभुत्व आवश्यक असून संगणक ज्ञान व मराठी टायपिंग कौशल्य असलेल्यांना विशेष प्राधान्य मिळणार आहे.
वयोमर्यादा व अर्ज शुल्क
उमेदवारांचे वय २१ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
अर्ज शुल्क पुढीलप्रमाणे आहे:
सर्वसाधारण प्रवर्ग – ₹३५४
अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्ग – ₹२६६
शुल्क ‘Drawing and Disbursing Officer, Akashvani, Pune – 411005’ यांच्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा (१०० गुण) व मुलाखत (१०० गुण) यांद्वारे होणार असून लेखी परीक्षेत किमान ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या सूचना
ही नियुक्ती गरजेनुसार पूर्णपणे कंत्राटी (Casual) तत्त्वावर करण्यात येणार आहे. विद्यमान कॅज्युअल न्यूज रीडर्सनाही पुनर्परीक्षणासाठी हजर राहावे लागेल. अर्ज स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपालाने किंवा प्रत्यक्ष खालील पत्त्यावर पाठवावेत:
Regional News Unit (RNU), आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
लिफाफ्यावर स्पष्टपणे “Application for News Reader cum Translator, RNU, Pune” असे नमूद करणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी
‘Vacancies | DD News On Air’ किंवा ‘Vacancy/NIA – Prasar Bharati’ या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क: ०२०-२५५१०५०६
(सोमवार ते शनिवार, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
पत्ता: आकाशवाणी, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
ईमेल: rnupune@prasarbharati.gov.in