अहिल्यानगर । प्रतिनिधी । नगरी नगरी :
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताण, आजारपण आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी पर्यायी उपचार पद्धतींकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये “आनंदी आणि सुदृढ जगण्याची कला – एनर्जी हीलिंग” या विषयावर दोन दिवसीय ऊर्जा उपचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा शनिवार २८ व रविवार २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत निर्मल चेंबर्स, होर्मो केअर लॅब समोर, लालटाकी, अहिल्यानगर येथे होणार आहे. योग प्राण विद्या ट्रेनर व एनर्जी हीलर पूनम खाडे या कार्यशाळेचे मार्गदर्शन करणार आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या हातांमध्ये नैसर्गिक ‘हीलिंग एनर्जी’ असते. योग्य पद्धतीने तिचा वापर केला तर औषधोपचारांशिवाय आणि शरीराला स्पर्श न करताही काही आजारांवर आराम मिळू शकतो. या कार्यशाळेत ही ऊर्जा कशी वापरायची, तिच्या साहाय्याने स्वतःचे व इतरांचे आरोग्य कसे सुधारायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कार्यशाळा विद्यार्थी, तरुण, नोकरदार, गृहिणी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी उपयुक्त असल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता वाढविण्यास, नोकरदारांना ऑफिसमधील ताण कमी करण्यास, गृहिणींना घरातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास आणि ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्यांमध्ये नैसर्गिक आराम मिळविण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.
दोन दिवसांच्या या प्रशिक्षणात सहभागींच्या हातांच्या साहाय्याने ऊर्जेतील दोष ओळखण्याची स्कॅनिंग पद्धत, शरीराला स्पर्श न करता उपचार करण्याची विना-स्पर्श हीलिंग, स्वतःच्या आरोग्यासाठी सेल्फ हीलिंग तसेच दूर असलेल्या व्यक्तींना ऊर्जा पाठवण्याची डिस्टन्स हीलिंग यासारख्या तंत्रांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या कार्यशाळेची फी ₹४,५०० असून त्यामध्ये हँडबुक व लाइफटाइम सपोर्टचा समावेश आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाच प्रवेशांसाठी फीमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी आपली जागा निश्चित करण्यासाठी पूनम खाडे (योग प्राण विद्या ट्रेनर व एनर्जी हीलर) यांच्याशी ८००७४८२६०८ या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे; ती जपण्यासाठी आजच पाऊल उचला,” असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.