जिद्दीची सुवर्णकथा… ४० वेळा अपयश, तरीही न खचता १२ वर्षांनी अधिकारी पदाचा मान!

यशोगाथा । मध्य प्रदेश । नगरी नगरी शेतकरी कुटुंबातील मुलगा… सलग ४० स्पर्धा परीक्षांत अपयश… तरीही न डगमगता जिद्दीने लढा……
1 Min Read 0 191

यशोगाथा । मध्य प्रदेश । नगरी नगरी

शेतकरी कुटुंबातील मुलगा… सलग ४० स्पर्धा परीक्षांत अपयश… तरीही न डगमगता जिद्दीने लढा… आणि अखेर १२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अधिकारी पदाची कमाई!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी ही कथा प्रेरणेचा दीपस्तंभ ठरावी अशी आहे.

स्वप्न मोठं… परिस्थिती बेताची !

काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि अथक मेहनत असेल तर स्वप्नं नक्की पूर्ण होतात, हे या यशोगाथेतून स्पष्ट होतं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मनोज पाल यांचा प्रवास एका छोट्याशा गावातून सुरू झाला. शिक्षण सरकारी शाळेत; मर्यादित साधनसामग्री; आणि घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती — या सगळ्यांवर मात करत त्यांनी स्वप्न पाहिलं सरकारी अधिकारी होण्याचं. १२ वीत अवघे ५० टक्के गुण. पण मनात मोठी उमेद! घरची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्याचा निर्धार केला.

४० अपयशांचा डोंगर… पण जिद्द कायम !

असं म्हणतात, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण अशा अपयशी पायऱ्यांचा डोंगर पार करणे सोपे नाही .

स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात करताना मनोज पाल वनरक्षक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा उत्तीर्ण; मात्र शारीरिक चाचणीत अपयश. त्यानंतर मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन (MPPSC) सह सुमारे ४० परीक्षांचे निकाल अपयश देणारे ठरले.

पण मनोज यांनी ध्येय सोडलं नाही. मित्र यशस्वी होत असताना स्वतः मात्र वारंवार अपयशी — ही वेदना सहन करणं सोपं नव्हतं. पण प्रत्येक अपयशातून त्यांनी शिकण्याचा मार्ग निवडला.

संघर्षातही स्वाभिमान आणि स्वावलंबन

आर्थिक अडचणींना सामोरं जाताना त्यांनी इंदौरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. कंटेंट रायटिंगचे कामही केले. या काळाने त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत केलं. संघर्षाने शिकवलं — इतरांना मदत करताना आपणही अधिक सक्षम होतो.

 

सातवा प्रयत्न… आणि स्वप्नपूर्ती !

१२ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष… सातवा प्रयत्न… आणि अखेर यशाचा क्षण उजाडला!

MPPSC २०२४ च्या लेखी परीक्षेत त्यांनी १५ वा क्रमांक पटकावला आणि मुलाखतही यशस्वीरीत्या पार केली. आज ते सहाय्यक संचालक ( वित्त विभाग) या पदावर कार्यरत आहेत.

त्यांच्या यशाने शेतकरी वडिलांचे डोळे अभिमानाने भरून आले. कुटुंबासाठी हा क्षण आयुष्यभराची कमाई ठरला.

या यशोगाथेचा संदेश

अपयश हे कायमस्वरूपी नसतं.

सातत्य, जिद आणि प्रामाणिक परिश्रम कधीच वाया जात नाहीत.

उशीर झाला तरी यश नक्की मिळतं.

४० अपयशांनंतरही हार न मानणारा हा प्रवास प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. जिंकण्याची जिद्द ठेवली तर तर अपयश हाच यशाचा मार्ग बनतो !

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content