जिद्द, संघर्ष आणि माणुसकीची सत्यकथा : नंदकिशोर आढाव यांची प्रेरणादायी यशोगाथा

सक्सेस स्टोरी । किरण डहाळे । नगरी नगरी : (Success Story) अडचणींचा डोंगर, अपयशाची सावली आणि तरीही न डगमगणारी जिद्द……
1 Min Read 0 372

सक्सेस स्टोरी । किरण डहाळे । नगरी नगरी :

(Success Story) अडचणींचा डोंगर, अपयशाची सावली आणि तरीही न डगमगणारी जिद्द… या तीन शब्दांत नंदकिशोर आढाव यांचा जीवनप्रवास सांगता येईल. खरं तर आढाव नगरकरांना परिचित आहेत ते एक सिने अभ्यासक म्हणून. सिनेमाविषयी, गाण्यांविषयी त्यांचे लिखाण नगरकर सातत्याने वाचत आले आहेत. हा छंद जोपासत असतानाच त्यांच्या व्यवसायाची वाटचाल त्यांनी यशस्वीपणे सुरु ठेवली.

(Success Story) वॉटरप्रूफिंग आणि पेस्ट कंट्रोल या क्षेत्रात तब्बल २५ वर्षे सातत्याने काम करत आढाव स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज अनेक प्रतिष्ठित संस्था आणि कंपन्या त्यांच्या ग्राहकांमध्ये आहेत, पण या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी दडलेली आहे.

 

👨‍👩‍👦 संस्कारांची शिदोरी

नंदकिशोर आढाव यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आई-वडिलांचे संस्कार. दोघेही संगमनेरचे माजी नगरसेवक असल्यामुळे समाजाशी जोडलेले राहण्याची आणि लोकांशी माणुसकीने वागण्याची शिकवण त्यांना लहानपणापासून मिळाली.

त्यांच्या जीवनाचा एक विचार ते नेहमी सांगतात —

“बस यह गलती हर बार करता हूँ… आदमी हूँ… आदमी से प्यार करता हूँ.”

माणसांवर विश्वास ठेवण्याची ही वृत्तीच त्यांच्या यशाचे गमक ठरली. मित्रांचा आणि सहकाऱ्यांचा “कारवाँ” वाढत गेला आणि त्यातूनच व्यवसायाची वाट तयार झाली.

🎓 शिक्षणानंतर नोकरीचा प्रवास

(Success Story) संगमनेरमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईला मोठ्या भावाकडे गेले. गावातील एका व्यक्तीच्या मदतीने त्यांना रे रोड येथील “टर्नर होर कंपनी” मध्ये स्टोअर असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली.

नऊ महिन्यांनंतर ते अहमदनगरला आले आणि १९७४ साली अरणगाव रोडवरील “इंडियन ह्युम पाईप कंपनी” (वालचंद ग्रुप) येथे एक्साईज व यार्ड कीपर म्हणून काम सुरू केले. तेथे त्यांनी ९ वर्षे सेवा दिली.

🏭 टाटा समूहातील कारकीर्द

१९८३ साली नागापूर एमआयडीसी येथील “रॅली उल्फ कंपनी” (टाटा ग्रुप व UK Wolf यांचे सहकार्य) मध्ये त्यांची नियुक्ती झाली. येथे त्यांनी एक्साईज व स्टोअर मॅनेजर या पदावर १८ वर्षे सेवा दिली.

२००० साली त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती (VRS) घेतली आणि व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले.

🧱 वॉटरप्रूफिंग व्यवसायाचा टर्निंग पॉइंट

(Success Story) स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी GE (USA) कंपनीचे वॉटरप्रूफिंग उत्पादन – सिलिकॉन सिलेंट व कोटिंग विक्री सुरू केली.

एकदा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनला पावसाळ्यात गळती लागली. अनेक कॉन्ट्रॅक्टर्स प्रयत्न करूनही गळती थांबवू शकले नव्हते.

तेव्हा नंदकिशोर आढाव यांनी स्वतः टेरेसवर वॉटरप्रूफिंगचे काम केले आणि गळती पूर्णपणे बंद झाली.

हा प्रसंग त्यांच्या व्यवसायातील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला.

📉 संघर्ष आणि अपयश

२०१७ साली कंपनी टाटा ग्रुपकडून पोतदार ग्रुपकडे विकली गेली आणि व्यवसाय मंदावू लागला.

या परिस्थितीत त्यांनी दिल्लीगेट येथे भाड्याने गाळा घेऊन नोकरीसोबत वॉटरप्रूफिंग व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला नोकरांचे वेतन स्वतःच्या पगारातून द्यावे लागत होते.

पेंटचा व्यवसाय सुरू केला पण स्पर्धा आणि उधारीमुळे बंद झाला

बागरोजा – हडको येथे हॉटेल व्यवसाय सुरू केला पण नोकरांवर अवलंबून असल्यामुळे अपयश आले.

पण त्यांनी हार मानली नाही.

🐜 पेस्ट कंट्रोल व्यवसायाची नवी दिशा

(Success Story) हॉटेल बंद झाल्यानंतर ती जागा कीटकनाशक विक्रेत्याला भाड्याने दिली. त्याच्या सल्ल्याने त्यांनी कीटकनाशक व्यवसायासाठी परवाना घेण्याचा विचार केला.

जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करून शेतीवरील कीटकनाशक फवारणीचा परवाना मिळाला. पण या व्यवसायासाठी मोठे भांडवल लागणार असल्यामुळे त्यांनी घरगुती पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

📜 परवाना मिळवण्याची कहाणी

पेस्ट कंट्रोल व्यवसायासाठी परवाना पुणे कृषी खात्याकडून मिळत होता. सुरुवातीला BSc (Agri) पदवी नसल्यामुळे परवाना नाकारण्यात आला.

परंतु योगायोगाने संबंधित अधिकारी त्यांच्या गावाकडचे निघाले. तसेच त्यांच्याकडे आधीच कीटकनाशकाचा परवाना असल्यामुळे शेवटी पेस्ट कंट्रोल लायसन्स मिळाले.

यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवीन दिशा आणि स्थैर्य मिळाले.

आजचा प्रवास

आज वॉटरप्रूफिंग आणि पेस्ट कंट्रोल व्यवसायाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्यांच्या दोन्ही मुली सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. तरीही ते म्हणतात —

“मी आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालू राहणार.”

आजही ते या व्यवसायात नवीन असणाऱ्या अनेकांना मार्गदर्शन करून त्यांना व्यवसायात उभे राहण्यास मदत करतात.

🏢 वॉटरप्रूफिंग आणि पेस्ट कंट्रोल व्यवसायातील त्यांचे मान्यवर ग्राहक :

शिक्षण संस्था

न्यु आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (लाल टाकी व पारनेर शाखा), सीएसआरडी , फिरोदिया हायस्कूल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मुळा एज्युकेशन सोनई, यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज इ .

सामाजिक संस्था

माऊली, न्यायालय स्नेहालय, फिरोदिया संस्था, फिरोदिया वृद्धाश्रम, जिल्हा ऐतिहासिक वास्तू संग्रहालय

या शिवाय अनेक नामवंत वित्तीय संस्था, औदयोगिक संस्था, हॉस्पिटल्स, बिल्डर्स त्यांच्या ग्राहकांमध्ये आहेत.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content