टी-२० विश्वचषक : भारत पोहचू शकतो सेमी फायनलमध्ये 

क्रिकेट । २४.०२ । नगरी नगरी : (World Cup) टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा…
1 Min Read 0 130

क्रिकेट । २४.०२ । नगरी नगरी :

(World Cup) टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा खेळ अत्यंत निराशाजनक ठरला. या पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला. मात्र तरीही काही समिकरणे जुळून आली तर भारतीय संघ अजुनही सेमी फायनलमध्ये पोहचू शकतो.

(World Cup) दरम्यान, वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेविरुद्ध तब्बल १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. सध्या वेस्ट इंडिजचा नेट रनरेट तब्बल +५.३ इतका सकारात्मक आहे, तर भारताचा रनरेट -३ वर घसरला आहे.

(World Cup) भारतासाठी समीकरण अधिक गुंतागुंतीचे

वेस्ट इंडिजचा मोठा विजय आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव यामुळे गुणतालिकेतील परिस्थिती भारतासाठी अधिक कठीण झाली आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतासमोर कठीण आव्हान उभे ठाकले आहे.

(World Cup) उपांत्य फेरीसाठी काय करावे लागेल?

भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर पुढील समीकरण जुळणे अत्यावश्यक आहे:

दक्षिण अफ्रिकेला वेस्ट इंडिज संघाला आगामी सामन्यात पराभूत करावे लागेल. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे.

याशिवाय, भारताला पात्र ठरायचे असेल तर वेस्ट इंडिजने उर्वरित दोन्ही सामने गमावणे आवश्यक आहे, आणि भारताने आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे अपरिहार्य आहे.

(World Cup) पुढील दोन सामने निर्णायक

आता भारतासाठी पुढील दोन सामने ‘करो या मरो’ स्वरूपाचे ठरणार आहेत. संघाने सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे असून, दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडिजला पराभूत करेल, अशी आशाही भारताला ठेवावी लागणार आहे. एकूणच, उपांत्य फेरीचे दार अजून पूर्णपणे बंद झालेले नाही; मात्र भारताला आता चुकांची मुभा अजिबात नाही!

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content