ट्रॅक्टरचलित सेन्सर यंत्रामुळे खतांमध्ये ३०% बचत; डॉ. प्रणव पावसे यांना नाबार्डचा राष्ट्रीय पुरस्कार

संगमनेर । नितीनचंद्र भालेराव । नगरी नगरी २३.०२ : (NABARD) शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करत पिकांच्या गरजेनुसार अचूक खतांची मात्रा…
1 Min Read 0 125

संगमनेर । नितीनचंद्र भालेराव । नगरी नगरी २३.०२ :

(NABARD) शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करत पिकांच्या गरजेनुसार अचूक खतांची मात्रा देणारे ट्रॅक्टरचलित सेन्सर आधारित यंत्र विकसित केल्याबद्दल हिवरगाव पावसा गावाचे डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त झाला आहे.

नाबार्डकडून ‘उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध – २०२३’ या श्रेणीत त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानांतर्गत एक लाख रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

(NABARD) डॉ. पावसे हे राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद बबनराव पावसे यांचे सुपुत्र असून, त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी संलग्न डॉ. अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्री., इंजि. ॲण्ड टेक्नॉलॉजी येथे पीएच.डी. संशोधन पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाला महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन मधुकर नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

(NABARD) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे संशोधन

डॉ. पावसे यांनी विकसित केलेले ट्रॅक्टरचलित सेन्सर यंत्र जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता व पिकांच्या गरजेनुसार खतांची अचूक मात्रा देते.

या यंत्राचे प्रमुख फायदे —

✅ ३०% खतांची बचत

✅ जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी

✅ मजुरांची कमतरता दूर

✅ शेतकऱ्यांचे श्रम व खर्च कमी

✅ हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत उत्पादन

अतिरेकी खत व औषधांच्या वापरामुळे शेती, पाणी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत आहे.

(NABARD) संशोधनातील उल्लेखनीय कामगिरी

१ पेटंट , १ कॉपीराइट, २५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन लेख, २ शैक्षणिक पुस्तके – कृषी अभियांत्रिकी व हवामान-स्मार्ट शेती क्षेत्रात हे संशोधन दिशादर्शक ठरत आहे.

हिवरगाव पावसा गावाचा वाढला राष्ट्रीय सन्मान : 

डॉ. प्रणव पावसे यांच्या संशोधनामुळे हिवरगाव पावसा गावाचा देशपातळीवर गौरव झाला असून, बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेतीसाठी हे संशोधन मोलाचे ठरणार आहे.

डॉ. पावसे यांच्या यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आ. सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

हिवरगाव पावसा गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्था प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला आहे.

 

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content