नेवासा l रावसाहेब राशिनकर l नगरी नगरी :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त श्री दत्त साधकाश्रम, चांदा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनास चांदा पंचक्रोशीतून मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. समाजातील भेदभाव दूर करून हिंदू समाज अधिक संघटित व्हावा आणि देव, देश व धर्मासाठी कार्यरत राहावा, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनासाठी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. प्रकाशानंद गिरीजी महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाशिक विभागाचे बौद्धिक प्रमुख श्री कृष्णाजी घरोटे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील, रामायणाचार्य देविदास महाराज आडभाई, तसेच संघाचे नेवासा तालुका कार्यवाह सुनील सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
🟩 धर्मसंरक्षणासाठी एकजुटीचा संदेश
ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, समाजाने जातीभेद विसरून धर्मकार्यासाठी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. “देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सक्रिय भूमिका घ्यावी. केवळ प्रेक्षक न राहता धर्माचे रक्षक व्हा,” असे त्यांनी आवाहन केले. तसेच कुटुंबात मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
🟦 संघ कार्य प्रेरणादायी – कृष्णाजी घरोटे
प्रमुख वक्ते कृष्णाजी घरोटे यांनी संघाच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, संघ शाखांमधून आदर्श व्यक्ती आणि सक्षम समाज निर्माण केला जातो. “समाज परिवर्तनातून राष्ट्र अधिक बलशाली बनते. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून वागणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
🟧 विद्यार्थ्यांची प्रबोधनपर नाटिका ठरली आकर्षण
चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उपक्रमशील शिक्षिका शांता मरकड-दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील संतांच्या वेशभूषेत समाजप्रबोधनपर नाटिका सादर केली. संतांच्या शिकवणीतील सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडल्याने उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
🟪 व्यापक जनजागृती अभियान
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ह.भ.प. योगेश्वरी ताई दरंदले यांनी संमेलनाच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. चांदा व परिसरातील ७ गावांतील २२३८ हिंदू कुटुंबांमध्ये ‘गृहसंवाद अभियान’ राबविण्यात आले होते. या मोहिमेत ४० कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. चांद्यातील विराट हिंदू संमेलनाने समाजात एकजूट, संस्कार आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित केले. संघटित समाजाच्या बळावर राष्ट्र अधिक सक्षम होऊ शकते, हा संदेश या संमेलनातून प्रभावीपणे देण्यात आला.
🟫 मोठ्या संख्येने उपस्थिती
चांदा, रस्तापूर, कौठा, बऱ्हाणपूर, म्हाळस पिंपळगाव आदी पंचक्रोशीतील गावांमधून माता-भगिनी व सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. संपूर्ण परिसरात