“नोकरी नव्हे, रोजगारनिर्मितीचा संकल्प करा!” डॉ. पाऊलबुधे फार्मसीत स्टार्टअप टॉक सिरीजला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर । विजय मते । नगरी नगरी : (Startup) अहिल्यानगर येथील वसंत टेकडीवरील डॉ. ना. ज. पाऊलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये सावित्रीबाई…
1 Min Read 0 70

अहिल्यानगर । विजय मते । नगरी नगरी :

(Startup) अहिल्यानगर येथील वसंत टेकडीवरील डॉ. ना. ज. पाऊलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने “स्टार्टअप टॉक सिरीज – तरुण उद्योजकांशी संवाद” या उपक्रमांतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. “बिहाइंड द स्टार्टअप – उद्योजक प्रवासावरील एक उद्योजकाचे मनोगत” या विषयावर आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

(Startup) कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शार्प मल्टिमीडिया सर्व्हिसेस प्रा. लि.चे संस्थापक व संचालक उद्योजक श्री. शुभम पोपळे उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्योग प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करत स्टार्टअप उभारताना येणाऱ्या अडचणी, अपयश, जोखीम, आर्थिक नियोजन, टीमवर्क तसेच सातत्य व नवकल्पना शक्तीचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांच्या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले.

(Startup) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम पांगा, प्राचार्या अनुराधा चव्हाण व फार्माकोग्नोसी विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे न बनता रोजगारनिर्माते होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. आजच्या काळात स्टार्टअप संस्कृती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमास विभागप्रमुख डॉ. वेणू कोला, डॉ. रोशनी सूर्यवंशी, डॉ. प्रसाद घुगारकर, सौ. स्वाती कडनोर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्टार्टअप व इनोव्हेशन सेलच्या समन्वयक प्रा. श्रद्धा मुंदडा यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. पूर्णिमा साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले.

(Startup) या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबद्दल प्रेरणा निर्माण होऊन स्टार्टअपकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकूल, व्यवस्थापकीय संचालक श्री. साई पाऊलबुद्धे, सचिव श्री. रामकिसन देशमुख, खजिनदार श्री. दादासाहेब भोईटे व संचालक मंडळाने कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content