अहिल्यानगर : सामाजिक सलोखा आणि वैचारिक समृद्धीचा संदेश देणाऱ्या ‘नब्ज ’ ईद विशेषांक प्रकाशन उदया अहिल्यानगरात करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, शहरातील साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘नब्ज ’ या विशेषांकाच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, बंधुता आणि विचारांची देवाणघेवाण अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ईदच्या पावन निमित्ताने प्रकाशित होणारा हा विशेषांक समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा प्रकाशन सोहळा शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला असून, अहिल्यानगरातील रेहमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, येथेहा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी सकल भारतीय समाजातील मान्यवर, विचारवंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून साथी सुभाष वारे, संध्याताई मेढे, युनूसभाई तांबटकर, काँ. प्रा. डॉ. महेबूब सय्यद, भैरवनाथ वाकळे तसेच सकल भारतीय समाजाचे पदाधिकारी कार्यरत आहेत.
या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक बळकट करण्याबरोबरच वैचारिक संवादाला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.