बैलजोडीचा दबदबा! वाघोली पशुपक्षी प्रदर्शनात विजय कातकडे यांचा प्रथम क्रमांक

शेवगाव | लक्ष्मण मडके | नगरी नगरी  : शेवगाव तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे आयोजित पशुपक्षी प्रदर्शनात बैलजोडीने अक्षरशः जलवा…
1 Min Read 0 184

शेवगाव | लक्ष्मण मडके | नगरी नगरी  :

शेवगाव तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे आयोजित पशुपक्षी प्रदर्शनात बैलजोडीने अक्षरशः जलवा दाखवत शेतकरी विजय बलभीम कातकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दमदार ताकद, आकर्षक बांधणी आणि देखणेपणाच्या जोरावर त्यांच्या बैलजोडीने परीक्षकांसह उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांची मने जिंकली.

पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात तालुक्यातील विविध भागांतून शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विविध जातींची जनावरे तसेच आकर्षक पक्ष्यांच्या प्रदर्शनामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलजोड्यांचे शारीरिक सामर्थ्य, आरोग्य, निगा आणि सादरीकरण या निकषांवर काटेकोर परीक्षण करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये सरस ठरत कातकडे यांच्या बैलजोडीने मानाचा पहिला क्रमांक पटकावला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रदर्शनातील विविध उपक्रम आणि स्पर्धांमुळे पशुपालन व्यवसायाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. अशा स्पर्धांमुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण जनावरे तयार करण्याची प्रेरणा मिळत असून पशुपालन व्यवसायाला चालना मिळत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

वाघोलीतील या पशुपक्षी प्रदर्शनाने ग्रामीण भागातील पशुपालन संस्कृतीला नवी ऊर्जा देत शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य व्यासपीठ मिळवून दिले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content