भाजपमध्ये मोठी फेररचना; डॉ. सुजय विखे पाटील प्रदेश उपाध्यक्षपदी

मुंबई । अहिल्यानगर । नगरी नगरी : महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भारतीय जनता पक्षाने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा…
1 Min Read 0 120

मुंबई । अहिल्यानगर । नगरी नगरी :

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भारतीय जनता पक्षाने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची थेट प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

(Politics) राज्य पातळीवर मोठी जबाबदारी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. या घोषणेत डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अन्य दहा नेत्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि पक्षविस्तारासाठी घेतलेल्या मेहनतीची दखल या नियुक्तीतून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

(Politics) अहिल्यानगर जिल्ह्यातून राज्य संघटनेतील एवढ्या उच्च पदावर वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ मानली जात असून, कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. डॉ. विखे पाटील यांनी या जबाबदारीला संधी मानत राज्यभर पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

(Politics ) प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली प्रमुख नावे

डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गोपीचंद पडळकर, भारती पवार, रामदास तडस, प्रविण पोटे यांचीही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे: तसेच चेतन देशमुख, अतुल कासेकर, संजय कोडगे, संजय भेंडे, केशव उपाध्याय आणि अर्चना चाकोरकर याशिवाय, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष, मुख्य प्रवक्ते तसेच युवा व महिला मोर्चाच्या पदांवरही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

(Politics) राजकीय समीकरणात नवा अध्याय

या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या राज्य संघटनेत ताजेपणा आणि नवे नेतृत्व समोर आले आहे. जिल्हा ते राज्य असा प्रवास करत नेतृत्वाला मिळालेली संधी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

(Politics) २०२९ निवडणुकांवर भाजपचे लक्ष :

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या नव्या कार्यकारिणीला मान्यता देताना २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही फेररचना केल्याचे संकेत दिले आहेत. संघटनात्मक बळकटी, नव्या नेतृत्वाला वाव आणि विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोच वाढवणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी ही आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक शिस्त, विस्तार आणि प्रभावी जनसंपर्क यावर भर देत भाजप पुढील वाटचाल करणार असल्याचे या घोषणेतून स्पष्ट झाले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content