मुंबई । गुरुदत्त वाकदेकर । नगरी नगरी :
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही अभ्यासक्रम बंद करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाज्योतीच्या प्रकल्प संचालकांनी दिली.
(महाज्योती) ११ प्रकारचे प्रशिक्षण सुरूच
महाज्योतीकडून एकूण ११ प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात.
यामध्ये यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, संयुक्त गट-ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात सुरू आहेत.
यूपीएससी प्रशिक्षणार्थींना प्रतिमाह ₹१३,००० विद्यावेतन व एकवेळ ₹१८,००० आकस्मिक निधी.
एमपीएससी व इतर प्रशिक्षणासाठी प्रतिमाह ₹१०,००० विद्यावेतन व एकवेळ ₹१२,००० आकस्मिक निधी.
या आर्थिक सुविधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
(महाज्योती) हजारो विद्यार्थ्यांना लाभ
२०२५–२६ मध्ये विविध प्रशिक्षणांत हजारो विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – २९८
कर्मचारी निवड आयोग – ४९९
मिलिटरी भरती – १,५००
एमबीए (सीएटी/सीएमएटी/सीईटी) – १,५००
यूजीसी नेट/सीएसआयआर/एमएच-सेट – १,२००
यूपीएससी – ४००
एमपीएससी गट-ब व क – ४००
एमपीएससी राज्यसेवा – ३००
जेईई/एनईईटी/एमएचटी-सीईटी – ३,५००
२०२६–२७ पासून काही अभ्यासक्रम ऑनलाईन
(महाज्योती) आयबीपीएस पीओ, बँकिंग, रेल्वे, एसएससी, आरआरबी आणि एमपीएससी अभियांत्रिकी सेवा या परीक्षा ऑनलाईन स्वरूपाच्या असल्याने २०२६–२७ पासून हे प्रशिक्षण ऑनलाईन राबविण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यावेतनाऐवजी विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि डेटा सिम देण्यात येणार आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तब्बल ४४,९०३ अर्ज प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
(महाज्योती) सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण
आर्थिक अडचणीमुळे पार्टटाईम नोकरी करणारे विद्यार्थी तसेच घरगुती जबाबदाऱ्यांमुळे शहरात येऊ न शकणाऱ्या गृहिणींनाही दर्जेदार प्रशिक्षण मिळावे, हा ऑनलाईन उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
ऑनलाईन प्रशिक्षणात
✔ लाईव्ह मार्गदर्शन
✔ शंका निरसन सत्र
✔ साप्ताहिक परीक्षा
पीडीएफ नोट्स व पुस्तके
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टॅबलेटचा १२ तासांचा बॅटरी बॅकअप आणि नेटवर्कनुसार सिम निवडीची सुविधा देण्यात येणार आहे.
स्पष्ट संदेश
वरील सर्व बाबींचा विचार करता, महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.