महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रसाद सामलेटी यांची निवड

अहिल्यानगर। १७.०२। अमोल भांबरकर : (निवड) अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे…
1 Min Read 0 80

अहिल्यानगर। १७.०२। अमोल भांबरकर :

(निवड) अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे व शहर जिल्हाध्यक्षपदी प्रसाद सामलेटी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर ग्रामीण कोषाध्यक्षपदी बबन शिंदे व शहर कार्यवाह म्हणून दीपक आरडे यांची निवड करण्यात आली.

(निवड) शिक्षकांचे शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक हित जपण्यासाठी संघटनेने राबविलेल्या उपक्रमांमध्ये सामलेटी यांचे योगदान उल्लेखनीय आहे.अध्यापन क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव,संघटन कौशल्य व नेतृत्वगुण यांचा विचार करून त्यांची निवड करण्यात आली, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत आगामी काळात शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थित शिक्षकांमधून व्यक्त करण्यात आला.

(निवड) नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष प्रसाद सामलेटी म्हणाले, शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल. गुणवत्तापूर्ण शिक्षण,शिक्षक सक्षमीकरण आणि संघटनात्मक एकतेवर भर देत कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच शहर कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित,नाशिक विभागाचे अध्यक्ष शरद दळवी , ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख सुनील सुसरे,शहराचे कार्यवाह घाडगे, उपाध्यक्ष नितीन केणे,सचिन गावडे,मार्कंडेय विद्यालयाचे प्राचार्य संदीप छिंदम, तानाजी काळुंगे, शिक्षक, क्रीडा संघटनेचे घनश्याम सानप, प्राथमिक संघटनेचे नंदकुमार हंबर्डे,गणेश नागपुरे, विनोद जोशी,अनंत जोशी,अजय महाजन,नांगरे सर ,निलेश आनंदास,अभिजित गवारे,शुभम टेमकर, निमसे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

या निवडीमुळे अहिल्यानगर शहरातील शिक्षक संघटनात्मक कार्याला नवे बळ मिळेल,अशी भावना शिक्षक वर्गात व्यक्त होत आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content