महिला दिन हा एक दिवस नाही तर वर्षातील ३६५ दिवस साजरा व्हायला हवा – आशाताई डोके

अहिल्यानगर । १०. २ । नगरी नगरी : सावेडी उपनगरात निर्मलनगर येथील डोके विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांच्या…
1 Min Read 0 64

अहिल्यानगर । १०. २ । नगरी नगरी :

सावेडी उपनगरात निर्मलनगर येथील डोके विद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांच्या सन्मानाबरोबरच किशोरवयीन मुलींमध्ये स्वावलंबनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आशाताई डोके यांनी महिला सक्षमीकरणावर प्रभावी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेळाव्यात मुलींनी स्वावलंबन कसे प्राप्त करावे, व्यवसाय कसा करावा याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. ‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून खरेदी-विक्री, नफा-तोटा, लहान व्यवसायाचे नियोजन याबाबत माहिती देण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक ज्ञान मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा मिळावी हा उद्देश होता. तसेच विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याची माहिती देण्यात आली.

आशाताई डोके यांनी सांगितले की, महिला दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षातील प्रत्येक दिवस महिलांचा सन्मान करणारा असावा. समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षण, आरोग्य, उद्योग, सामाजिक कार्य अशा सर्व क्षेत्रांत महिलांनी मोठे योगदान दिले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या काळात मुलींनी आत्मनिर्भर होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाबरोबरच आर्थिक व्यवहाराची समज, व्यवसायाची ओळख आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे उपक्रम मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनवतात. मुख्याध्यापिका क्षेत्रे मॅडम यांनी आपल्या भाषणात महिलांनीच महिलांचा सन्मान करणे, एकमेकांना समजून घेणे व परस्पर आदर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी सुप्रिया वाळके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अभिषेक खामकर, किरण जाधव उपस्थित होते. शेवटी बाल आनंद मेळाव्याचे आशादेवी डोके यांनी विशेष कौतुक केले व कार्यक्रमात सहभागी सर्वांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका रिबिका क्षेत्रे यांनी केले होते. सूत्रसंचालन राणी राऊत यांनी केले. प्रयत्ना नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, महिला, पालक, तसेच शिक्षिका नवगिरे मंजू, बर्वे संजीत, धामणे आशा, मंदाकिनी पांडुळे, सुजाता कर्डिले, ज्योती पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content