यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातूरमध्ये नोकरीची संधी. अर्ज करण्याचा उदया शेवटचा दिवस.लातूर । १६.०२ । नगरी नगरी :
(Bank) मराठवाड्यातील अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातूर येथे मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यालयासह औसा व धाराशिव शाखांमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीद्वारे बँकेच्या कामकाजात आधुनिकता आणणे, ग्राहकसेवा अधिक प्रभावी करणे तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
बँकेतील उपलब्ध पदे व शाखा :
शाखाधिकारी – २ पदे, औसा (१) व धाराशिव (१)
लिपिक – ५ पदे, लातूर (२), औसा (२), धाराशिव (२)
लिपिक (ऑडिट विभाग) – २ पदे, मुख्य कार्यालय
आय.टी. ऑफिसर – १ पद, मुख्य कार्यालय
मार्केटिंग / इन्शुरन्स ऑफिसर – ३ पदे, लातूर (१) व धाराशिव (२)
वसुली अधिकारी – १ पद, मुख्य कार्यालय
पात्रता व अनुभव :
शाखाधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. JAIIB/CAIIB किंवा GDCA सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक असून वयोमर्यादा ३० ते ५५ वर्षे आहे.
लिपिक पदासाठी वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, BCS, BCA, BE, B.Tech, MCA पदवी व MS-CIT आवश्यक आहे. JAIIB/CAIIB किंवा GDCA सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. किमान ३ वर्षांचा अनुभव अपेक्षित असून वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे आहे.
ऑडिट विभागातील लिपिक पदासाठी B.Com, M.Com, CA इंटर किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे. बँक ऑडिट, कर रिटर्न, TDS कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे आहे.
आय.टी. ऑफिसर पदासाठी BCA, B.E.(IT), B.Tech, MCA किंवा M.Sc IT पात्रता आवश्यक आहे. सर्व्हर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सायबर सिक्युरिटी व बँकिंग सिस्टीमचा अनुभव असावा. वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे आहे.
मार्केटिंग/इन्शुरन्स ऑफिसर पदासाठी कोणतीही पदवी आवश्यक असून बँकिंग, फायनान्स किंवा इन्शुरन्स क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे आहे.
अर्ज प्रक्रिया :
इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला संपूर्ण बायोडाटा, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे, फोटो, ओळखपत्र तसेच कोणत्या पदासाठी व कोणत्या शाखेसाठी अर्ज करीत आहेत हे स्पष्ट नमूद करून अर्ज पाठवावा.
📧 ई-मेल: hr@yashwantbanklatur.com
🗓️ अंतिम तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत.
महत्वाची सूचना
अपूर्ण अर्ज व उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
पात्र उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
भरती प्रक्रिया बँकेच्या अंतर्गत नियमांनुसार होईल.
स्वाक्षरी: चेअरमन
यशवंत नागरी सहकारी बँक लि., लातूर
दिनांक: १० फेब्रुवारी २०२६