युध्द तणावाचा विमानसेवांवर परिणाम; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष उड्डाणांची योजना

नवी दिल्ली । ४.०२ । वृत्तसंस्था : ( War updates ) पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर…
1 Min Read 0 142

नवी दिल्ली । ४.०२ । वृत्तसंस्था :

( War updates ) पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत. या परिस्थितीत अडकलेल्या भारतीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. ४ मार्च रोजी भारतीय विमान कंपन्यांकडून एकूण ५८ उड्डाणे चालवण्याची योजना आखण्यात आली असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली.

५८ उड्डाणांची विशेष योजना :

( War updates ) नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

इंडिगो कंपनीकडून ३० उड्डाणे, एअर इंडिया

आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांच्याकडून २३ उड्डाणे

अशी एकूण ५८ उड्डाणे ४ मार्च रोजी पश्चिम आशिया मार्गावर चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उड्डाणांमुळे पश्चिम आशियात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना परत आणण्यास तसेच प्रवास सुलभ करण्यास मदत होणार आहे.

अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था

मंत्रालयाने सांगितले की, अडकलेल्या प्रवाशांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी विमान कंपन्यांना अतिरिक्त क्षमता उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी परदेशातील विमान प्राधिकरणे तसेच भारतीय दूतावासांशी समन्वय साधून प्रवाशांची सुरक्षित आणि सुव्यवस्थित वाहतूक सुनिश्चित केली जात आहे.

याशिवाय अमिराती आणि एतिहाद या परदेशी विमान कंपन्यांनी गेल्या २४ तासांत गल्फ देशांतून ९ उड्डाणे चालवली आहेत.

( War updates ) बंद हवाई क्षेत्रामुळे उड्डाणांवर परिणाम

पश्चिम आशियातील काही देशांमध्ये हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने विमानसेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. त्यामुळे अनेक उड्डाणांना पर्यायी मार्गांचा वापर करून उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हजारो उड्डाणे रद्द

सरकारच्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

भारतीय विमान कंपन्यांची १२२१ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत तर परदेशी कंपन्यांची ३८८ उड्डाणे रद्द झाली आहेत .

फक्त २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत १११७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. तर ३ मार्च रोजी भारतीय कंपन्यांची १०४ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली.

प्रवाशांसाठी पारदर्शक माहिती देण्याचे निर्देश

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना प्रवाशांशी पारदर्शक संवाद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच

तिकीट परतावा (Refund) , उड्डाणाचे पुनर्नियोजन (Rescheduling), प्रवाशांना मदत

या बाबींमध्ये नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.

( War updates ) एअर इंडियाची घोषणा

दरम्यान, एअर इंडियाने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, मध्यपूर्वेतील परिस्थिती लक्षात घेऊन युएई , सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतार येथील बहुतेक उड्डाणे ४ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहेत.

सध्याच्या परिस्थितीवर सरकार, विमान कंपन्या, विमानतळ प्राधिकरणे आणि परराष्ट्र मंत्रालय सतत लक्ष ठेवून असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content