वंचितांसोबत शिवजयंती : छत्रपती शंभुराजे चौक मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम

अहिल्यानगर | २०.०२ । नगरी नगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छ. शंभुराजे चौक मित्र मंडळामार्फत यंदाही सामाजिक बांधिलकी जपत…
1 Min Read 0 71

अहिल्यानगर | २०.०२ । नगरी नगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छ. शंभुराजे चौक मित्र मंडळामार्फत यंदाही सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरी करण्यात आली. गेली १२ वर्षे अखंड सुरू असलेला “वंचितांसोबत शिवजयंती” हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

(Social) विद्यार्थ्यांची रॅली व खाऊ वाटप

सकाळी दुर्गादेवी नय्यर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त रॅली काढली. या रॅलीतील सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. परिसरातील बालचमु तसेच बालघरातील वंचित विद्यार्थ्यांनीही उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

(Social) ध्वनीप्रदूषणमुक्त उत्सव

१० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे कोणतेही ध्वनी किंवा वायू प्रदूषण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली. शांत, शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट नियोजनातून कार्यक्रम पार पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

(Social) पोवाड्याने रंगली संध्याकाळ

संध्याकाळी कृष्णा पुंड या बालकाने शिवाजी महाराजांचा पोवाडा गात अभिनयातून प्रभावी सादरीकरण केले. त्याच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

बालघरातील वंचित विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि अहिल्यानगरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. ज्योती अमोल गाडे यांच्या उपस्थितीत जिजाऊ वंदना करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. श्रावणी वाखुरे, अवनी जोशी, वेदिका वाडेकर, विराज वाखुरे, दक्ष दहातोंडे, सौ. जया वाखुरे, सौ. पवार, सौ. राजश्री नगरे, सौ. दहातोंडे, सौ. पूजा वाडेकर, सौ. प्रियंवदा जोशी, सौ. दिपाली जगताप, शैला साबळे, प्रदीप वाखुरे, ॲड. विक्रम वाडेकर, अमोल गाडे, राहुल जोशी, राजू नगरे, शंतनु पांडव, विकास जोशी, राहुल काळे, राहुल पवार, दत्ता दहातोंडे, सचिन निक्रड, प्रशांत पवार, दत्ता चव्हाण, शिवाजी वाघमोडे, अविनाश निक्रड, कैलास गाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

सामाजिक जाणिवा, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि वंचितांप्रती आपुलकी यांचा संगम साधत छ. शंभुराजे चौक मित्र मंडळाने शिवजयंतीला वेगळे आणि प्रेरणादायी स्वरूप दिले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content