वॉशिंग्टन । २०.०२ । नगरी नगरी :
(Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान मे २०२५ मधील लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. मात्र या प्रकरणात कोणतीही तृतीय पक्ष मध्यस्थी मान्य नसल्याचे भारत सरकारने अनेकदा स्पष्ट केले आहे.
(Donald Trump) ‘बोर्ड ऑफ पीस’ कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी “११ महागडी जेट विमाने पाडली गेली” असा नवा दावा करत दोन्ही देशांना व्यापार करार आणि टॅरिफच्या माध्यमातून इशारा दिल्याचे सांगितले. “जेव्हा मोठ्या आर्थिक तोट्याचा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी लढाई थांबवण्याचा विचार केला” असे ते म्हणाले. भारताने हा दावा ठामपणे फेटाळला आहे.
(Donald Trump) बदलते आकडे, वाढते दावे :
गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांनी ८० हून अधिक वेळा भारत-पाक तणाव आपण थांबवला असा दावा केला आहे. विशेष म्हणजे जेट विमाने पाडल्याबाबत त्यांनी वेगवेगळे आकडे दिले आहेत :
सुरुवातीला ५
त्यानंतर ७
ऑगस्टमध्ये ८
अलीकडे १०
आणि आता ११ विमाने
या बदलत्या आकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.
(Donald Trump)‘२०० टक्के टॅरिफ’चा इशारा?
ट्रम्प यांनी दोन्ही देशांना व्यापार करारांचा दबाव टाकल्याचे सांगितले. “जर तुम्ही लढाई थांबवली नाही, तर मी तुमच्या देशांवर २०० टक्के टॅरिफ लावीन,” असा इशारा दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या विधानालाही नवी दिल्लीकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
(Donald Trump) भारताची भूमिका स्पष्ट
भारताने पूर्वीच स्पष्ट केले आहे की, भारत-पाक संबंधांमध्ये कोणत्याही तृतीय पक्षाची मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांवरून राजनैतिक वर्तुळात चर्चा रंगली असली तरी भारताची भूमिका ठाम असल्याचे दिसून येते. या नव्या दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.