शनिशिंगणापूर देवस्थान ॲप घोटाळा प्रकरण गाजणार? ED-CBI चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका; 30 मार्चला सुनावणी

सोनई/शनिशिंगणापूर । विजय खंडागळे । नगरी नगरी : श्री शनिशिंगणापूर देवस्थान येथील कथित ॲप घोटाळा आणि इतर आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर…
1 Min Read 0 206

सोनई/शनिशिंगणापूर । विजय खंडागळे । नगरी नगरी :

श्री शनिशिंगणापूर देवस्थान येथील कथित ॲप घोटाळा आणि इतर आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर ED व CBI मार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका (PIL 7/26) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

🔎 “फक्त 77 लाखांचा घोटाळा दाखवणे म्हणजे सेटलमेंट” – आरोप

देवस्थानातील कथित हजारो कोटींचा घोटाळा वरिष्ठ स्तरावरून सेटल करून पोलिसांनी केवळ 77 लाख रुपयांचा अपहार दाखवला, असा आरोप ग्रामस्थ व शनीभक्तांकडून करण्यात येत आहे. मोठ्या स्तरावरील जबाबदारांवर कारवाई न करता दोन कर्मचाऱ्यांना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, असेही सांगितले जात आहे.

विधानसभेत नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, संपूर्ण प्रकरण दाबले गेल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

⚖️ ED-CBI चौकशीची मागणी

सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणाची चौकशी Enforcement Directorate (ED) आणि Central Bureau of Investigation (CBI) मार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही दखल न घेतल्याने त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, प्रक्रियेनुसार प्रथम उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली.

📑 याचिकेतील प्रमुख मागण्या

1️⃣ देवस्थानातील ॲप घोटाळ्याची ED-CBI मार्फत चौकशी

2️⃣ बनावट पावती, QR स्कॅन, बोगस देणगी व अतिरिक्त कर्मचारी भरती घोटाळ्यांची चौकशी

3️⃣ मागील 15 वर्षांचे संपूर्ण ऑडिट केंद्रीय ऑडिटर व माजी न्यायाधीशांच्या समितीद्वारे करणे

🔔 “न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही”

जर उच्च न्यायालयातून न्याय मिळाला नाही, तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सचिन दरंदले यांनी स्पष्ट केले. सर्व दोषींवर कारवाई व सर्व कथित घोटाळ्यांची सखोल चौकशी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकरणामुळे शनिशिंगणापूर परिसरात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून 30 मार्चच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content