अहिल्यानगर । १७.०२ । नगरी नगरी –
उर्दू भाषा ही अस्सल भारतीय भाषा आहे. संस्कृती संवर्धनामध्ये उर्दू भाषेचा फार मोठा सहभाग आहे. जीवनाचे सर्व रंग उर्दू भाषेमध्ये पाहायला मिळतात. ही भाषा मनाला भुरळ घालते. उर्दू शायरी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करते असे प्रतिपादन सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुनील कडासने यांनी केले.
(साहित्य ) जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे वतीने साजरा करण्यात आलेल्या उर्दू अशरा म्हणजे दहा दिवसांच्या उर्दू भाषेच्या विविध कार्यक्रमाचा समारोप आणि जिल्ह्यातील उर्दू शिक्षकांना विविध पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ अहिल्यानगर येथील एन एम गार्डन येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
(साहित्य ) अध्यक्षस्थानी माजी आयपीएस अधिकारी सुनील कडासने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बालभारती पुण्याचे उर्दू अधिकारी नवेदुल हक खान, मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम शेख, उर्दू बचाव समितीचे राज्य अध्यक्ष अब्दुल्ला हसन चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी शब्बीर लालू शेख, कुलसूम मुनीर फाउंडेशन पुण्याचे अध्यक्ष रिजवान मुनीर शेख, परिषदेचे उपाध्यक्ष के के खान, सहसचिव डॉ.कमर सुरूर,डॉ. जहीर मुजावर, शिक्षण विस्तार अधिकारी राज मोहम्मद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
(साहित्य ) यावेळी माजी आयपीएस अधिकारी सुनील कडासने यांनी अस्खलित उर्दूमध्ये भाषण करून, आपल्या शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली.त्यांनी कुरआन सह सर्व धर्मग्रंथांचे दाखले देत समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने आपल्याला निर्माण केले आहे. त्यामुळे आपण कोणाचाही द्वेष न बाळगता एकमेकांशी प्रेमाने जगले पाहिजे असे आवाहन केले.
बालभारतीचे उर्दू भाषा अधिकारी नवेदुलहक खान यांनी बालभारती मध्ये पुस्तकांची निर्मिती कशा पद्धतीने केले जाते याचा सविस्तर आढावा घेतला.
(साहित्य ) प्रस्ताविक भाषणात उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी गेल्या वीस वर्षापासून जिल्ह्यात उर्दू सप्ताह साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. चार हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असे सांगून उर्दू ही अविट गोडीची भाषा असून उर्दू भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी उर्दू अशरा मध्ये सहभागी जिल्ह्यातील सर्व शाळांना स्मृतिचिन्ह तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
(साहित्य ) पुरस्काराचे मानकरी :
याप्रसंगी जिल्ह्यातील शकील खान,हाजी शकील बागवान, हारुण कुरेशी, मोहम्मद हनीफ शेख,सय्यद मुदस्सर सुलताना, अफसाना तांबोळी, शाहाना लोधी, जाकेरा शेख,अनिसा शेख,समीना साचे, आसमा मुलानी, मुबशीर खान,नसीम शेख,तरन्नुम खान, निशातअख्तर पठाण, शाहीन अहमद, जाहिदा शेख,मिनाज पटेल व रुबीना तांबोळी यांना मोहसीने तालीम अवॉर्ड तर कलीम शेख,समीना शेख,मेहरूनिसा खान,गौसिया शेख, सुमय्या शेख यांना खिदमते उर्दू अदब अवॉर्ड व नुजहत सय्यद,नसरीन इनामदार,सायरा बानो शेख, शमजा बागवान व अंजूम शेख यांना फातिमा बी शेख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीना शेख व नाजेमा शेख यांनी केले.आभार परिषदेचे खजिनदार फैयाज शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिषदेचे सचिव आबिद दुलेखान, कार्याध्यक्ष शाकीर शेख,उपाध्यक्ष इमाम सय्यद,सदस्य नवेद मिर्झा, बदर शेख, सय्यद सदाकत हुसेन,वसीम शेख, नर्गिस इनामदार, डॉ.शमा फारुकी, फैरोज हसन,शबनम शेख,मिनाज शेख, सलीम शेख जुलूस, नौशाद सय्यद, शाहनवाज गुलाब, अरबाज पठाण, फिरोजखान पठाण, स्थानिक नियोजन समितीचे हाजी शरफोद्दीन शेख, समीना शेख,शमजा बागवान,अस्मा शेख, फरजाना सय्यद,फरहत शेख, नाजेमा शेख, नाजीया शेख, सुमय्या सय्यद, आसिफ शेख, साजिद कुरेशी, मतीन मणियार आदींनी परिश्रम घेतले.