१० मार्च दिनविशेष

१० मार्चच्या मुख्य ऐतिहासिक घटना : १८६२: अमेरिकेत पहिल्यांदा कागदी नोटा (चलनी नोटा) जारी करण्यात आल्या. १८७६: अलेक्झांडर ग्रॅहम बेल…
1 Min Read 0 20

१० मार्चच्या मुख्य ऐतिहासिक घटना :

१८६२: अमेरिकेत पहिल्यांदा कागदी नोटा (चलनी नोटा) जारी करण्यात आल्या.

१८७६: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी पहिला यशस्वी टेलिफोन कॉल केला.

१९२२: महात्मा गांधी यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि सहा वर्षांची शिक्षा झाली.

१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान ऍंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९८५: भारताने पाकिस्तानला पराभूत करून मेलबोर्न येथे बेन्सन ऍण्ड हेजेस चॅम्पियनशिप हि क्रिकेट स्पर्धा जिकली.

१९९८: — भारतीय बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुध्दिबळ स्पर्धा जिंकली.

१९९८: भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केले.

१९९८: भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

२०१५: पुणे विद्यापीठाचे नामकरण ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्यात आले

१० मार्च जन्म :

१६२८: मार्सेलिओ माल्पिघी — इटालियन डॉक्टर

१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) — बडोदा संस्थानातील अत्यंत प्रगतीशील आणि परोपकारी मराठा शासक आणि महाराज

१९१८: छोटा गंधर्व — स्वरराज, गायक आणि अभिनेते

१९२९: मंगेश पाडगावकर — सुप्रसिद्ध मराठी कवी — पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण

१९३९: असगर अली इंजिनिअर — भारतीय लेखक

१९४५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचा जन्म

१९४७: किम कॅम्पबेल — कॅनडा देशाच्या पहिल्या महिला आणि १९ व्या प्रधानमंत्री

१९७०: ‘जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते उमर अब्दुल्ला यांचा जन्म

१९७४: बिझ स्टोन — ट्विटरचे सहसंस्थापक

१० मार्च विशेष दिवस :

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिन

राष्ट्रीय महिला आणि मुली एचआयव्ही/एड्स जागरूकता दिन

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content