११ मार्च दिनविशेष

११ मार्च महत्वाच्या घटना १८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. १८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी…
1 Min Read 0 26

११ मार्च महत्वाच्या घटना

१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.

१८८६: आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.

१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदा सदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.

१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.

१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार प्रदान.

१९९९: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारे हरभजनसिंग हे पहिले भारतीय गोलंदाज बनले. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

११ मार्च जन्म

१८७३: युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक डेव्हिड होर्सले यांचा जन्म.

१९१२: नाटककार शं. गो. साठे यांचा जन्म.

१९१५: भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचा जन्म.

१९१६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म.

११ मार्च विशेष दिवस – 

धूम्रपान निषेध दिन (मार्चचा दुसरा बुधवार)

धूम्रपानामुळे आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरातील लोकांना धूम्रपान सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिन साजरा केला जातो.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content