१२ मार्च दिनविशेष

१२ मार्च महत्वाच्या ऐतिहासिक घटना १९११: — कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत मानापमान या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. १९१८: —…
1 Min Read 0 86

१२ मार्च महत्वाच्या ऐतिहासिक घटना

१९११: — कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या संगीत मानापमान या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९१८: — रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथून मॉस्को येथे हलविण्यात आली.

१९३०: — महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलांच्या दांडी यात्रेला सुरुवात केली.

१९६८: — मॉरिशसला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९९१: — जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी झाली.

१९९२: — स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारून मॉरिशस प्रजासत्ताक बनले.

१९९३: — मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.

१९९९: — चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड नाटो (NATO) मध्ये सामील झाले.

२००१: — ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१२ मार्च जन्म :

१८२४: — गुस्ताव्ह किरचॉफ — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (निधन: १७ ऑक्टोबर १८८७).

१८९१: — चिंतामणराव कोल्हटकर — अभिनेते व निर्माते, नटवर्य (निधन: २३ नोव्हेंबर १९५९).

१९११: — भाऊसाहेब बांदोडकर — गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक (निधन: १२ ऑगस्ट १९७३).

१९१३: — यशवंतराव चव्हाण — भारताचे ५वे उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .

१९३१: — हर्ब केलेहर — साउथवेस्ट एअरलाईन्सचे सहसंस्थापक.

१९३३: — विश्वनाथ नरवणे — लेखक व कवी.

१९८४: — श्रेया घोषाल — प्रसिद्ध पार्श्वगायिका, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती.

१२ मार्च जागतिक दिवस

जागतिक किडनी दिन (World Kidney Day): दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो.

मॉरिशस दिवस (Mauritius Day): मॉरिशसमध्ये हा दिवस स्वातंत्र्य दिन (१९६८) आणि प्रजासत्ताक दिन (१९९२) म्हणून साजरा केला जातो .

जागतिक अग्निहोत्र दिन

नॅशनल प्लांट अ फ्लॉवर डे

राष्ट्रीय डुलकी दिवस (National Napping Day)

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content