१४ मार्च दिनविशेष

१४ मार्च महत्वाच्या घटना १९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला. १९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना…
1 Min Read 0 185

१४ मार्च महत्वाच्या घटना

१९३१: पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला.

१९५४: दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.

१९६७: अमेरीकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पार्थिव आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी येथे हलविण्यात आले.

२०००: कलकत्ता येथील टेक्‍निशियन आय हा देशातील सर्वात जुना स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

२००१: सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकीला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली.

२००१: व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने ईडन गार्डन वर नाबाद २७५ धावा काढून या मैदानावरील सर्वोच्‍च धावांचा सुनील गावसकरचा विक्रम मोडला. तसेच एका डावात ४४ चौकार मारण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

२०१०: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते लोकसंस्कृतीचे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना पुण्यभूषण पुरस्कार पुण्यात देण्यात आला.

१४ मार्च जन्म

१८७४: फिलिप्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी चे सहसंस्थापक आंतोन फिलिप्स यांचा जन्म.

१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन आणि अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांचा जन्म.

१८९९: इर्विंग ओईल कंपनी चे संस्थापक के. सी. इर्विंग यांचा जन्म.

१९०८: विन्सेंट मोटारसायकल कंपनी चे संस्थापक फिलिप व्हिन्सेंट यांचा जन्म.

१९३१: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचा जन्म.

१९३३: ब्रिटिश अभिनेता मायकेल केन यांचा जन्म.

१९६१: ब्लॅकबेरी लिमिटेड चे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्म.

१९६३: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रूस रीड यांचा जन्म.

१९७४: पार्श्वागायिका साधना घाणेकर उर्फ साधना सरगम यांचा जन्म.

१९७२: भारतीय कवी इरोम चानू शर्मिला यांचा जन्म.

१९७४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर रोहित शेट्टी यांचा जन्म.

१९६१: भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार – उमेश कट्टी

१९१४: पहिली डेटोना ५०० रेस जिकणारे अमेरिकन कार रेसर – ली पेटी

१८५४: जर्मन चिकित्सक आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – पॉल एर्लिच

१८३३: अमेरिकन दंतचिकित्सक, दंतचिकित्सा शाळेतून पदवीधर होणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला – ल्युसी हॉब्स टेलर

१४ मार्च जागतिक दिवस :

आंतरराष्ट्रीय गणित दिवस (IDM): यूनेस्को (UNESCO) ने २०१९ मध्ये या दिनाला मान्यता दिली. हे गणित आणि मानवी विकासाचा संबंध दर्शवते.

जागतिक पाई दिवस (Pi Day): हा दिवस

(पाई) या गणितातील मूल्याशी संबंधित आहे

 

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content