१५० वर्षांपूर्वी जर्मनीत छापलेल्या शिवरायांच्या दुर्मिळ चित्राचा इतिहासप्रेमी आशुतोष पाटील यांनी लावला शोध

( History ) पुणे | १९.२ | नगरी नगरी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती युरोपपर्यंत पोहोचली…
1 Min Read 0 115

( History ) पुणे | १९.२ | नगरी नगरी

छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती केवळ भारतापुरती मर्यादित नसून ती युरोपपर्यंत पोहोचली होती, याचा ठोस पुरावा समोर आला आहे. इ.स. १८७० च्या दशकात जर्मनीत प्रकाशित झालेल्या एका बहुखंडी ज्ञानकोशात शिवरायांचे चित्र प्रसिद्ध झाले होते. त्या दुर्मीळ पानाचा अभिमानास्पद शोध इतिहासप्रेमी आशुतोष पाटील यांच्यामुळे लागला आहे.

( History ) सुमारे दीडशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापले गेले होते, ही बाब त्यांच्या वैश्विक प्रभावाची साक्ष देणारी ठरते.

जर्मन ज्ञानकोशातील ऐतिहासिक नोंद :

जर्मनीमध्ये प्रकाशित झालेला Illustrierte Konversations-Lexikon हा त्या काळातील महत्त्वाचा संदर्भग्रंथ मानला जात होता.

‘vergleichendes Nachschlagebuch für den täglichen Gebrauch. Hausschatz für das deutsche Volk und Orbis pictus für die studirende Jugend’ या उपशीर्षकासह प्रसिद्ध झालेला हा ग्रंथसंच जर्मन मध्यमवर्गीय कुटुंबे, शाळा व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला होता.

हा ग्रंथ लिपझिग आणि बर्लिन येथे कार्यरत असलेल्या प्रकाशक Franz Otto Spamer यांच्या प्रकाशनसंस्थेतून प्रसिद्ध झाला होता. एकूण आठ मुख्य खंड आणि दोन परिशिष्ट खंड अशा दहा खंडांमध्ये हा संच प्रकाशित झाला.

 ‘Häuptlinge der Mahratten’ — मराठ्यांचा प्रमुख

१८७७ मध्ये प्रकाशित झालेल्या खंडात ‘East India’ या शीर्षकाखाली भारतासंबंधी माहिती देताना अवघ्या दोन-तीन चित्रांचा समावेश करण्यात आला होता. त्यात तंजावरचे मंदिर, मुघलांचे हरम आणि तिसरे म्हणजे ‘Häuptlinge der Mahratten’ (मराठ्यांचा प्रमुख) या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशित करण्यात आले होते.

या चित्राला ४३८६ असा क्रमांक देण्यात आला असून ते खंडाच्या ११६३ व्या पानावर आहे.

शोधाचा प्रवास :

हे अस्सल पान आशुतोष पाटील यांच्या संग्रही आले होते; मात्र ते नेमके कोणत्या ग्रंथातील आहे, याचा माग काढण्यासाठी त्यांना दीर्घ काळ संशोधन करावे लागले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि या दुर्मीळ पानाचा मूळ स्रोत निश्चित झाला.

पाटील यांच्या मते, या पानावरील जर्मन भाषेतील मजकूर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचे भाषांतर लवकरच उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.

जागतिक प्रभावाचा पुरावा :

युरोपातील १९व्या शतकातील ज्ञानकोशात स्थान मिळालेल्या शिवाजी महाराजांच्या चित्रामुळे त्यांच्या जागतिक कीर्तीला अधोरेखित करणारा हा अनमोल ऐतिहासिक ठेवा ठरत आहे. इतिहासप्रेमींसाठी हा शोध अभिमानास्पद आणि अभ्यासकांसाठी संशोधनाचा नवा अध्याय ठरणार आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content