१६ मार्च : महत्वाच्या घटना
१५२१: फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोहोचला.
१५२८: फत्तेपूर सिक्री येथे राणा संग आणि बाबर यांच्यात युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
१६४९: शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
१९११: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
१९१९: भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडला.
१९३७: महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
१९४३: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
१९६६: अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७६: इंग्लंडचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांनी राजीनामा दिला.
२०००: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.

१६ मार्च जन्म

१६९३: इंदूर राज्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांचा जन्म.
१७५०: जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिना हर्षेल यांचा जन्म.
१७५१: अमेरिकेचे ४थे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांचा जन्म.
१७८९: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांचा जन्म.
१९०१: भारताचे ७वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण प्र. बा. गजेंद्रगडकर यांचा जन्म.
१९१०: ८वे पतौडी नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांचा जन्म.
१९२१: सौदी अरेबियाचे राजा फहाद यांचा जन्म.
१९३६: संगीतकार भास्कर चंदावरकर यांचा जन्म.
१९३६: चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक प्रभाकर बर्वे यांचा जन्म.
१९३६: एम.आर.आय. चे शोधक रेमंड वहान दमडीअन यांचा जन्म.
१९३२: फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक – कर्ट डिमबर्गर
१९२५: गर्भनिरोधक गोळीचे संशोधक – लुइस ई. मिरमोंटेस
१९१८: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार – फ्रेडरिक रेनेस
१६ मार्च : विशेष
राष्ट्रीय लसीकरण दिवस (भारत):
हा दिवस आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि पोलिओविरुद्ध लढ्याची आठवण करून देण्यासाठी भारतात साजरा केला जातो. देशभरात लसीकरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असतो.
राष्ट्रीय पांडा दिवस (National Panda Day):
पांडा या वैशिष्ट्यपूर्ण अस्वलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
माहिती स्वातंत्र्य दिवस (Freedom of Information Day):
अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि माहितीच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
“एव्हरीथिंग यू डू इज राईट डे” (Everything You Do Is Right Day) आणि “नॅशनल आर्टिचोक डे” (National Artichoke Day) म्हणूनही ओळखला जातो.