१७ मार्च महत्वाच्या घटना
१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.
१७ मार्च जन्म :
१८३४: इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक
१८६४: भारतीय अभियंता जोसेफ बाप्टीस्ता यांचा जन्म.
१८७३: युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला – मार्गारेट बॉन्डफिल्ड
१८८१: स्विस फिजियोलॉजिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार – वॉल्टर रुडॉल्फ हेस
१९०९: भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म.

१९१०: समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ – पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार – अनुताई वाघ यांचा जन्म
१९२०: बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा जन्म.

१९६२: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर – कल्पना चावला यांचा जन्म
१७ मार्च विशेष दिवस :
सेंट पॅट्रिक दिवस (St. Patrick’s Day):
हा दिवस आयर्लंडचे संरक्षक संत सेंट पॅट्रिक यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी जगभरात, विशेषतः आयरिश समुदायांमध्ये, हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात आणि मिरवणुका काढल्या जातात.
जागतिक सामाजिक कार्य दिवस (World Social Work Day):
हा दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि समाजामध्ये त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो.