१८ मार्च दिनविशेष

१८ मार्च महत्वाच्या घटना १८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली. १९२२: महात्मा गांधींना असहकार…
1 Min Read 0 129

१८ मार्च महत्वाच्या घटना

१८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.

१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

१८ मार्च जन्म

१५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म.

१८३७: अमेरिकेचे २२ वे आणि २४ वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड याचा जन्म

१८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म.

१८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म.

१८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म.

१९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.

१९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म.

१९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म.

१९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म.

१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.

१९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म.

१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.

१९६३: पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक व्हेनेसा विल्यम्स याचा जन्म

१८ मार्चचे महत्त्वाचे दिवस :

जागतिक पुनर्चक्रण दिन (Global Recycling Day): नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी आणि पुनर्वापराचे महत्त्व समजण्यासाठी .

आयुध निर्माणी दिवस (Ordnance Factories Day): भारतात १८०१ मध्ये पहिली आयुध निर्माण फॅक्टरी स्थापन झाल्याच्या सन्मानार्थ.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content