१ मार्च महत्वाच्या घटना :
१५६५ – रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.
१८०३ – ओहयो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले.
१८७२ – यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
१८७३ – ई रेमिंगटोन आणि सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र चे उत्पादन सुरु होते.
१८९३ – अभियंते निकोला टेसला यांनी पहिल्या रेडिओचे प्रत्याक्षिक दाखवले.
१८९६ – हेन्री बॅक्वरल अनुकिरणोत्सराची किरणे सोडली .
१९०१ – ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापना करण्यात आले.
१९०७ – टाटा आर्यन अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.
१९३६ – अमेरिकेतील महाकाय हुव्हर बांधून पुर्ण केले.
१९४६ – बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण झाले.
१९४७ – आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
१९४८ – गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९६१ – अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन केले.
१९५४ – प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजण बॉम्बची दुसरी चाचणी घेतली.हा स्फ़ोट हिरोशीमाच्या स्फ़ोटपेक्षा ६०० पट जास्त शक्तीशाली होता.
१९६१ – युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुका झाल्या.
१९९२ – बोन्सिया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९९८ – एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.
१९९८ – दक्षिणात्य गायिका एम एस सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२००२ – पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने युरो हे चलन स्वीकारले.
१ मार्च जन्म –
१९२२ – नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांचा जन्म.
१९३० – उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म.
१९४४ – पश्चिम बंगाल चे 7 वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.
१ मार्चचे प्रमुख दिवस आणि महत्त्व –
जागतिक नागरी संरक्षण दिन (World Civil Defence Day):
१ मार्च १९९० पासून आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटना (ICDO) द्वारे हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो.
शून्य भेदभाव दिवस (Zero Discrimination Day):
हा दिवस समानतेचा संदेश देण्यासाठी आणि कायद्यासमोर भेदभाव रोखण्यासाठी साजरा केला जातो.
(सूचना : दिनविशेष या सदरासाठी सर्व माहिती विविध स्त्रोतांमधून गोळा केलेली असून, त्यात काही तफावत असू शकते.)