२० मार्च घटना :
१६०२ : डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
१७३९ : नादिरशहाने दिल्ली बरखास्त केली. मयुरासनासह नवरत्न लुटून इराणला पाठवले.
१८५४ : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकाची स्थापना झाली.
१९०४ : चर्च ऑफ इंग्लंडचे धर्मगुरू चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज हे महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी भारतात आले.
१९१६ : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला.

१९२७ : महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला. हा लढा म्हणजे मनुवादी व्यवस्थेला दिलेले मोठे आव्हान होते, ज्यातून अस्पृश्यांना “आम्हीही माणसे आहोत” हे सिद्ध करायचे होते.
१९५६ : ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९८२ : फ्रान्सने अणुचाचणी केली.
२०१५ : सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
२० मार्च जन्म :
१८२८ : ‘हेनरिक इब्सेन’ – नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी यांचा जन्म.
१९०८ : ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता यांचा जन्म.
१९२० : ‘वसंत कानेटकर’ – नाटककार यांचा जन्म.
२० मार्च जागतिक दिन :
जागतिक चिमणी दिवस :

जागतिक चिमणी दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी अनेक स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण प्रेमी चिमण्यांच्या संवर्धनासाठी उपक्रम राबवतात. चिमण्यांसाठी घरटे तयार करणे, त्यांच्या अन्न आणि पाण्याची सोय करणे, यासारख्या लहान प्रयत्नांतून त्यांचे जीवन वाचवता येते. जागतिक चिमणी दिवस आपल्या परिसरातील या लहान जीवांच्या महत्त्वाची जाणीव करून देतो आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करतो. चिमण्या पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या कीटक नियंत्रित करतात आणि झाडांच्या बीजांचे प्रसारक म्हणून कार्य करतात. त्यांची अनुपस्थिती पर्यावरणातील असमतोलाचे सूचक आहे. त्यामुळे चिमण्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
जागतिक मौखिक स्वास्थ्य दिवस :
जागतिक मौखिक स्वास्थ्य दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे, योग्य तोंडी स्वच्छता पद्धतींचे महत्त्व पटवणे आणि दातांच्या विविध समस्या टाळण्यासाठी उपाय सुचवणे हा आहे. तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने दातदुखी, हिरड्यांचे आजार, दुर्गंधी, दात किडणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सामाजिक समता दिन :
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ २० मार्च हा दिवस भारतात ‘सामाजिक सबलीकरण दिन’ किंवा ‘समता दिन’ म्हणून पाळला जातो