नेवासे । १८.०२ । जावेदा जिंदगी :
( Social) सुप्रसिध्द साहित्यिक राजन खान यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या अक्षर मानव या सामाजिक संघटनेचा बावीसावा अक्षर मानव संवाद सहवास यंदा अहिल्यानगर जिल्हयातल्या नेवासा येथे सौंदाळा गावात होणार आहे.
( Social ) २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हा उपक्रम संपन्न होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, निरंजन टकले, अॅड. असीम सरोदे, विवेक सावंत, राजू परुळेकर यांच्याशी संवाद झाले आहेत.
( Social ) यंदाचा संवाद सहवास हा उपक्रम काहीसा वेगळा असून कुठल्याही एका व्यक्तिशी हा संवाद न करता सौंदाळा गावातील सर्वच ग्रामस्थांशी उपस्थितांना संवाद साधता येणा आहे.निवांत, शांत ठिकाणी जमून आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घेता यावा आणि विचारमंथन करावे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नसून नांव नोंदणी आवश्यक आहे . नांव नोंदणीसाठी खालील क्रमांकावर फक्त व्हॉटसॲप संदेशाद्वारे संपर्क साधता येईल. उपस्थितांसाठी जेवण आणि चहाची व्यवस्था अक्षर मानवच्यावतीने करण्यात आली आहे.
नावनोंदणी फक्त व्हॉटसॲप संदेशाद्वारे :
हरिभाऊ उगले (9881218706), अनुजा पाटील (+919370384012), आझाद खान (+919975326210)
वरीलपैकी कोणाही एकाच प्रतिनिधीकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.