२३ मार्च महत्वाच्या घटना

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. (Ok) या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.
१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.
१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.
१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरू केली.

१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.
१९५३: पाकिस्तान – देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान करण्यात आले.
१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.
१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.
२३ मार्च जन्म :
१६९९: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.
१७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.
१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.
१८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.
१८८३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म.
१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म.
१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म.
१९०१: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचा जन्म
१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ.राममनोहर लोहिया यांचा जन्म.
१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.
१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म.
१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म.
१९२९: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचा जन्म
१९३१: रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.
१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.
१९५४: अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.
२३ मार्च जागतिक दिन

शहीद दिन (भारत) :
भारतात हा दिवस ‘शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. २३ मार्च १९३१ रोजी थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली होती. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान म्हणून भारत सरकार हा दिवस कृतज्ञतेने साजरा करते.
जागतिक हवामानशास्त्र दिन (World Meteorological Day):
दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामान संघटना (WMO) च्या १९५० मधील स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश हवामानातील बदलांबद्दल जनजागृती करणे हा असतो.
जागतिक अस्वल दिन (World Bear Day):
अस्वलांच्या विविध प्रजातींचे संरक्षण आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २३ मार्च हा दिवस जागतिक अस्वल दिन म्हणूनही ओळखला जातो.