२७ मार्च महत्वाच्या घटना :
१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
२७ मार्च जन्म :
१४१६: इटालियन तपस्वी आणि संत, ऑर्डर ऑफ द मिनिम्सचे संस्थापक पाओला च्या फ्रान्सिस यांचा जन्म.
१७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म.
१८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म.
१८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म.
१९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म.
२७ मार्च जागतिक दिवस :
जागतिक रंगभूमी दिन ( World Theater Day )
