२ मार्च दिनविशेष

२ मार्च महत्वाच्या घटना १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला. १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.…
1 Min Read 0 14

२ मार्च महत्वाच्या घटना

१८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.

१८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.

१९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.

१९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

१९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.

१९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.

१९५६: मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

१९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.

१९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.

१९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.

१९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.

२००१: बामियाँमध्ये अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.

२ मार्च जन्म

१७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म.

१९१४: भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार – तोता सिंग

१९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म.

१९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.

१९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.

१९४२: भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार – गीता नागाभूषण

१९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.

२ मार्च जागतिक दिन

२ मार्च हा प्रामुख्याने टेक्सास स्वातंत्र्य दिन (USA)श्रीलंका हवाई दल दिन आणि बहाई धर्मात ‘अला’ (उन्नतता) उपवासाचा पहिला दिवस म्हणून पाळला जातो.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content