३० मार्च महत्वाच्या घटना :
१६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.
१७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
१८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
१८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
१९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
३० मार्च जन्म :
१८२०: तस्मानिया देशाचे ६वे प्रीमियर, स्कॉटिश-ऑस्ट्रेलियन राजकारणी जेम्स व्हाईट याचा जन्म
१८५३: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांचा जन्म.
१८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म.
१८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म.
१८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म.
१९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म.
१९०८: अभिनेत्री देविका राणी यांचा जन्म.
१९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.
१९४२: भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

३० मार्च महत्त्वाचे दिवस
जागतिक द्विध्रुवीय विकार दिन (World Bipolar Day): मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ‘बायपोलर डिसऑर्डर’शी संबंधित सामाजिक कलंक दूर करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन (International Day of Zero Waste): संयुक्त राष्ट्रांद्वारे शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
राजस्थान राज्य स्थापना दिन (Rajasthan Day): १९४९ मध्ये याच दिवशी राजस्थान राज्याची स्थापना झाली होती, त्यामुळे भारतात हा दिवस ‘राजस्थान दिन’ म्हणून साजरा होतो.

डॉक्टर्स डे (National Doctors’ Day – USA): अमेरिकेसह काही देशांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल ३० मार्च रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो (भारतात हा १ जुलै रोजी असतो).