संवाद | १४.२ | किरण डहाळे
(Press) वाचक हो, नमस्कार !
नगरीनगरी हे शीर्षक आपल्याला आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या (तत्कालिन अहमदनगर केंद्र) माध्यमातून ज्ञात आहे. नगरी बोली भाषेतील हा कार्यक्रम श्रोत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. सलग बारा वर्षे सुरु असणाऱ्या या कार्यक्रमामुळे श्रोत्यांपर्यंत पोहचता आले. आकाशवाणी केंद्रावरून या कार्यक्रमाचे प्रसारण बंद झाल्यानंतर नगरीनगरी युट्यूब चॅनेल सुरु झाले आणि नगरी बोलीने समाज माध्यमाच्या (Social Media) पटलावर पाऊल ठेवले. तिथेही दर्शकांनी या कार्यक्रमाचे भरघोस स्वागत केले. आजपावेतो या चॅनेलची सदस्य संख्या (Subscribers) ८१००० हून जास्त आहेत.
फेसबुकवर ‘आम्ही अहमदनगरी’ या पेजलाही नगरकरांनी चांगला प्रतिसाद देत सात हजारांहून जास्त नगरकरांनी त्याचे सदस्यत्व घेतले आहे.
(Press) या सगळ्या वाटचालीत ‘नगरीनगरी’च्या श्रोत्यांना, दर्शकांना नेमके काय वाचायला आवडेल याचा थोडासा अंदाज येऊ लागला होता. कुठल्या प्रकारच्या बातम्या, माहिती आणि इतर मनोरंजनात्मक बाबींबद्दल वाचायला आवडेल याचा विचार डोक्यात घोंघावत होता. जेव्हा ते चित्र स्पष्ट झाले, तेव्हा हे नगरकरांपर्यंत लवकरात लवकर कसं पोचवायचं याचा विचार मनात आला . या संदर्भात दैनिक रयत समाचारचे संपादक भैरवनाथ वाकळे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मार्ग सुचविला NagariNagari News Portal चा.
आज व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर NagariNagari चे News Portal सुरु केले आहे. जे जे उत्तम आहे, सकारात्मक आहे ते वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून सुरु केला आहे.
(Press) पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. तेव्हा या क्षेत्रात जनसामान्यांचा सक्रीय सहभागही गरजेचा आहे. नगरीनगरी न्यूज पोर्टल सुरु करतांना वाचकांचा सहभागही अपेक्षित आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. आपल्या भागातील आपल्याला योग्य वाटणारी घटना कळविल्यास संपादक मंडळाच्या निर्णयानुसार ती प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय आपल्या अंगभूत लेखन कौशल्याचाही आम्हाला उपयोग होईल. आपली स्वलिखित कथा, कविता खाली दिलेल्या व्हॉटसॲप क्रमांकावर जरूर पाठवा.
ही भूमिका मांडताना एक हक्काची विनंती आहे, या न्युजपोर्टलची लिंक http://nagarinagari.com, बातम्या, लेख आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. नगरीनगरीवर प्रेम करणारे श्रोते, दर्शक आणि वाचक यामुळे एकमेकांशी जोडले जातील. आपल्या सर्वांच्या सोईसाठी NagariNagari हा व्हॉटसॲप ग्रुप देखील तयार केला आहे. मात्र आपल्याकडे असणारी बातमी, माहिती या ग्रुपवर न पोस्ट करता वैयक्तिक व्हॉटसॲप क्रमांकावर पाठवावी, ही नम्र विनंती.
आजवर श्रोत्यांनी आणि दर्शकांनी जे उदंड प्रेम दिले ते नगरीनगरी न्युज पोर्टललाही मिळेल याची खात्री आहे.
धन्यवाद !
आपला – किरण डहाळे
संपर्कासाठी व्हॉटसॲप क्रमांक – 8208883477
Email Id – advoice23publicity@gmail.com
Facebook
X.com
LinkedIn
Instagram
Pinterest
More
Social Media
Communication
Bookmarking
Developer
Entertainment
Academic
Finance
Lifestyle
Post Views: 178
2 thoughts on “Press | ‘नगरीनगरी’चा नवा अध्याय; आपल्या न्यूजपोर्टलची भूमिका”