Education | तक्षशिला झाली जिल्ह्यातील पहिली ‘AI-Ready School’; विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा नवा मार्ग खुला

नेवासा | १४.२ | नगरीनगरी (Education) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत तालुक्यातील देडगाव येथील तक्षशिला…
1 Min Read 0 26

नेवासा | १४.२ | नगरीनगरी

(Education) तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत तालुक्यातील देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलने अहमदनगर जिल्ह्यातील पहिली ‘AI-Ready School’ होण्याचा मान पटकावला आहे. शाळेने ‘AI Classroom Foundation Course’ यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल JioPC तर्फे शाळेला अधिकृत ‘AI-Ready School’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

(Education) कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence (AI) चे वाढते महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या यशामुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशामागे मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. विजय कदम आणि संचालिका शुभांगी कदम यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.

(Education) शाळेचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य मयुरी पवार आणि उपप्राचार्य संदीप खाटीक यांच्या नेतृत्वाखाली हा कोर्स प्रभावीपणे राबवण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयटी शिक्षक अलफिया शेख व सुनील मुंगसे तसेच समन्वयक कल्पना पवार यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देत आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आमचे ध्येय आहे. ‘AI-Ready School’चा दर्जा मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना शाळा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली.

या गौरवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही शाळेच्या आधुनिक दृष्टिकोनाचे स्वागत केले आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content