Education | वांबोरी स्टेशन जिल्हा परिषदेच्या शाळेत कुसुमाग्रज वाचनालय सुरू

राहुरी । १५.२ | दीपक हरिश्चंद्रे (Education) कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा, वांबोरी स्टेशन येथे कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन अहिल्यानगर…
1 Min Read 0 139

राहुरी । १५.२ | दीपक हरिश्चंद्रे

(Education) कुसुमाग्रज वाचन अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा, वांबोरी स्टेशन येथे कुसुमाग्रज वाचनालयाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व वांबोरी बीटच्या विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.

(Education) विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी लागावी, विद्यार्थी संस्कारक्षम व्हावेत यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत कुसुमाग्रज वाचन अभियान १४ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेले आहे. वांबोरी स्टेशन शाळेतील ग्रंथालयात आठशे पुस्तके असून शाळा व्यवस्थापन समिती मार्फत अजून शंभर पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. शाळेच्या लेझीम पथकाने केलेल्या संचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

(Education) वांबोरी स्टेशन माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तसेच सिद्धी ॲक्वा आर.ओ. वॉटर प्युरिफायरचे सर्वेसर्वा नवनाथ खळेकर यांनी दिलेल्या ५१०००/- रुपये किंमतीच्या आरो सिस्टीम-शुद्ध पिण्याचे पाणी यंत्राचे उद्घाटन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

शाळेतील आरोग्यदायी परसबाग, गांडूळ खत प्रकल्प, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय प्रगती, राहुरी तालुका गणित विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी खडांबे गावचे उपसरपंच मोहन खळेकर, भानुदास कल्हापुरे, अर्जुनराव खळेकर, राहुल कल्हापुरे, नवनाथ खळेकर, प्रसाद शेळके, राजेंद्र कल्हापुरे, गोरक्षनाथ कल्हापूरे, काकासाहेब खळेकर, दिलीप दुधाडे आदी ग्रामस्थांसह शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उषा पवार, चारुशीला रायकर, कानिफनाथ बनकर व राहुल लोंढे यांनी परिश्रम घेतले.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content