पुणे । १४.२ । नगरी नगरी
(Politics) राष्ट्रीय नेते शरद पवार यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बरी नव्हती. बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याच्या विधीला शरद पवार उपस्थित राहणार होते. परंतु त्याचदिवशी सकाळपासून त्यांना त्रास होत होता. त्या संदर्भात पुढील उपचारांसाठी शरद पवार रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल झाले होते . त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
(Politics) आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चिंतेचे कोणतेही कारण नाही. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून नियमित औषधोपचार सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपासण्या समाधानकारक आढळल्याने त्यांना मर्यादित प्रवासास परवानगी देण्यात आल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले .
(Politics) मात्र, तब्बेत पूर्णपणे ठणठणीत झाल्यानंतरच पुढील दौरे आणि बैठकींचे नियोजन केले जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.