(Social)निवेदकाने मांडली संकल्पना : साखरपुड्यातच विवाह झाला संपन्न !

(Social) सोनई ।१६.०२। विजय खंडागळे : पाहुणे मंडळींचा मान-सन्मान राखण्यासाठी लग्नामध्ये निवेदकाला आवर्जुन बोलवले जाते. पण हाच निवेदक जेव्हा समाजभान…
1 Min Read 0 70

(Social) सोनई ।१६.०२। विजय खंडागळे :

पाहुणे मंडळींचा मान-सन्मान राखण्यासाठी लग्नामध्ये निवेदकाला आवर्जुन बोलवले जाते. पण हाच निवेदक जेव्हा समाजभान ठेवून त्याचे काम करतो तेव्हा समाजासमोर एक आदर्श उदाहरण तयार होते.

(Social) चनकापूर येथील गंगाधर जरे यांची मुलगी साक्षी व संजय ज्ञानदेव शेटे यांचा मुलगा शुभम, शनैश्वर देवस्थानचे सरचिटणीस आप्पासाहेब शेटे यांचे पुतणे शुभम यांचा विवाह ठरला. त्या आधी साखरपुडा समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे निवेदन एस.बी.शेटे यांचेकडे होते. साखरपुडयाला झालेली प्रचंड गर्दी पाहून शेटे यांनी साखरपुड्यातच लग्न करावे. असे केल्याने विवाहासाठी होणारा अनाठायी खर्च, नातेवाईकांची होणारी धावपळ या सर्व गोष्टी त्यांनी वधू – वर पक्षांना समजाऊन सांगितल्या.

(Social) त्यांच्या या संकल्पनेचा दोन्ही पक्षांनी विचार विनिमय करुन स्वीकार केला आणि भविष्यातला मोठा खर्च तर टाळला गेलाच पण उपस्थितांसमोर एक आदर्श उदाहरणही घातले गेले. निवेदकाची समयसुचकता आणि या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले आणि वधुवरांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या विवाहप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक बाप्पुसाहेब शेटे, प्रा. शेटे, माजी सरपंच शिवाजी शेटे, अविनाश बाणकर, सुनील गोसावी,प्रा. चितळे, राजाभाऊ शेटे, शुभम गाढे,उद्धवराव कळसकर, खोकरचे प्रगतशील शेतकरी संजय जाधव,व दत्ता चोथे यांच्या सह जरे व शेटे परिवारातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content