SPECIAL DAY । १७ फेब्रुवारी दिनविशेष

१७ फेब्रुवारी घटना :  १८०१: — अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ…
1 Min Read 0 46

१७ फेब्रुवारी घटना : 

१८०१: — अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह् ने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

१८५९: द ग्रेट अटलांटिक आणि पॅसिफिक टी कंपनी (A&P) — सुरवात.

१९२७: — रणदुंदुभि नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९३३: — अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.

१९६४: — अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

१९९६: — महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्ह यांच्या कडून पराभूत.

२००८: — कोसोव्हो देशाने स्वातंत्र्य जाहीर केले.

१७ फेब्रुवारी जन्म : 

१९६३: जेन-ह्सून हुआंग — एनव्हीडियाचे सहसंस्थापक

१९५१: जगदीश मोहंती — भारतीय लेखक आणि अनुवादक

१९४४: बर्नी ग्रँट — ग्रेट ब्रिटन मधील संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय

१९४२: ह्यू पी. न्यूटन — अमेरिकन कार्यकर्ते, ब्लॅक पँथर पार्टीचे सह-संस्थापक

१८८८: ओटो स्टर्न — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार

१८८६: एरिक झेग्नर — सॅक्सनी देशाचे पंतप्रधान

१८८०: अल्वारो ओब्रेगन — मेक्सिको देशाचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष

१८७४: थॉमस वॉटसन — अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM)चे अध्यक्ष

१८५४: फ्रेडरिक क्रूप्प — जर्मन उद्योगपती

१७८१: रेने लेनेक — फ्रेंच डॉक्टर, स्टेथोस्कोपचे संशोधक

जागतिक दिन :

जागतिक पर्यटन लवचिकता दिवस :

जागतिक पर्यटन लवचिकता दिवस दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रांनी 2022 मध्ये हा दिवस अधिकृतपणे जाहीर केला. कोविड-19 महामारीनंतर पर्यटन क्षेत्राला मोठे नुकसान सहन करावे लागले, त्यामुळे पुनर्बांधणी आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पर्यटन हा अनेक देशांसाठी प्रमुख आर्थिक स्रोत आहे, त्यामुळे त्याच्या लवचिकतेवर भर देणे आवश्यक आहे.

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media

Share this content