अहिल्यानगर l १५.०२ । नगरीनगरी
(Sports) आज महाशिवरात्रीच्या दिवशी टी ट्वेन्टी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत- पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये हाय होल्टेज सामना पहायला मिळणार आहे . या सामन्याच्या अनुषंगाने यापूर्वी या दोन्ही संघादरम्यान झालेल्या सामन्यांचा नगरीनगरीने घेतलेला आढावा :
(Sports) १९९२ च्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आयोजित विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले. तेव्हापासून भारत-पाकिस्तान सामना म्हणजे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापेक्षाही मोठे आकर्षण ठरू लागला आणि प्रत्येक सामन्याला महामुकाबला असे म्हटले जाऊ लागले .
(Sports) ३४ वर्षांतील भारत – पाक सामन्यांची आकडेवारी : १९९२ पासून आतापर्यंत आयसीसीने एकूण २७ प्रमुख स्पर्धांचे आयोजन केले आहे. या ३४ वर्षांच्या कालावधीत ९ वनडे विश्वचषक, ९ चॅम्पियन्स ट्रॉफी, ९ टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आल्या आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकूण २२ वेळा आमनेसामने आले. यातील १८ सामने भारताने जिंकले असून, पाकिस्तानला केवळ ४ वेळाच विजय मिळवता आला आहे.
एकूण सामने : २२, भारत विजयी : १८, पाकिस्तान विजयी : ४
१९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तान विश्वविजेता बनला होता, मात्र त्या स्पर्धेतही त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला आजवर एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे पारडे जड : पाकिस्तानने भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये ज्या चार सामन्यांत हरवले आहे, त्यापैकी त्यांचे तीन विजय हे ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’मधील आहेत.
२००४ : पाकिस्तान ३ गडी राखून विजयी. २००९ : पाकिस्तान ५४ धावांनी विजयी. २०१७ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा १८० धावांनी विजय.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकातच पाहायला मिळतात. आयसीसी स्पर्धांमधील दोन्ही संघांतील अखेरची लढत २३ फेब्रुवारी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत झाली होती, ज्यात भारताने पाकिस्तानला ६ विकेट्स आणि ४५ चेंडू राखून पराभूत केले होते. तर सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने रंगले आणि तिन्ही सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली. अंतिम सामन्यातही भारताने पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद पटकावले. २०२१ (टी-२० विश्वचषक) मध्ये पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. हा विश्वचषकातील (वनडे आणि टी-२० मिळून) पाकिस्तानचा भारतावरील एकमेव विजय आहे.
या सर्व पार्श्वभूमिवर, सर्व अडथळे पार करत आज संध्याकाळी होत असलेला हा सामना काही प्रमाणात पावसाच्या सावटाखाली आहे . कोलंबो हवामान खात्याने पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून जर पावसाने आपली गैरहजेरी लावली तर सामना होण्यात कुठलीही अडचण नाही .
हे ही वाचा : Press | ‘नगरीनगरी’चा नवा अध्याय; आपल्या न्यूजपोर्टलची भूमिका
Facebook
X.com
LinkedIn
Instagram
Pinterest
More
Social Media
Communication
Bookmarking
Developer
Entertainment
Academic
Finance
Lifestyle
Post Views: 47