२७ फेब्रुवारी दिनविशेष

१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले. १९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना. १९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा…
1 Min Read 0 26

१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

२७ फेब्रुवारी जन्म

१२३४: मंगोल इल्खानातेचे शासक – आबाका खान

१८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म.

१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म.

१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म.

१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

१९२५: टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष – शोइचिरो टोयोडा

१९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म.

१९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.

१९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म.

१९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

२७ फेब्रुवारी दिनविशेष :

मराठी भाषा गौरव दिन : २७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक एनजीओ दिवस: जगभरातील गैर-सरकारी संस्थांच्या योगदानाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय ध्रुवीय अस्वल दिवस (International Polar Bear Day): ध्रुवीय अस्वल आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी साजरा केला जातो .

Nagari Nagari

नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Share on Social Media