२४ मार्च घटना :
१३०७ : देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.
१६७७ : दक्षिण दिग्विजयप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.
१८३६ : कॅनडाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.
१८५५ : आग्रा आणि कलकत्ता शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८८३ : शिकागो आणि न्यूयॉर्क यांच्यात पहिले दूरध्वनी संभाषण झाले.
१८९६ : ए.एस. पोपोव्हने इतिहासात प्रथमच रेडिओ सिग्नल प्रसारित केला.
१९२३ : ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.
१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.
१९७७ : मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

१९९३ : धूमकेतू शूमाकर-लेव्ही-9 चा शोध लागला. हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरू ग्रहावर आदळला होता.

१९९८ : टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.
२००८ : भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका झाल्या.
२४ मार्च जन्म :
१७७५: ‘मुथुस्वामी दीक्षीतार’ – तामिळ कवी व संगीतकार यांचा जन्म.
१९०१ : ‘अनब्लॉक आय्व्रेक्स’ – अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते यांचा जन्म.
२४ मार्च जागतिक दिन :
जागतिक क्षयरोग दिन : World Tuberculosis Day
२४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन डॉ.रॉबर्ट कोच यांच्या १८८२ मध्ये क्षयरोग (टीबी) ला कारणीभूत असलेल्या जिवाणूच्या शोधाच्या निमित्त साजरा केला जातो.

हा दिवस क्षयरोगाच्या जागतिक आव्हानावर लक्ष केंद्रित करतो . क्षयरोगाच्या प्रभावाबद्दल आणि त्यावर मात करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवतो.