घटना :
१८१९: ऍडम्स-ऑनिस करार — स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
१८५६: युनायटेड स्टेट्स रिपब्लिकन पक्ष — पिट्सबर्ग येथे पहिले राष्ट्रीय अधिवेशन सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध — फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडून पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१९४४: दुसरे महायुद्ध — सोव्हिएत रेड आर्मीने क्रिव्होई रोग प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
१९४४: दुसरे महायुद्ध — अमेरिकन विमानांनी चुकून निजमेगेन, अर्न्हेम, एन्शेडे आणि डेव्हेंटर या डच शहरांवर बॉम्बफेक केली, परिणामी एकट्या निजमेगेन शहरात किमान ८०० लोकांचे निधन.
१९४८: झेकोस्लोव्हाकिया — देशामध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९५८: संयुक्त अरब प्रजासत्ताक — इजिप्त आणि सीरिया या देशांनी मिळून निर्माण केले.
१९५९: ली पेटी — अमेरिकन कार रेसर, यांनी पहिली डेटोना ५०० रेस जिंकली.
१९७४: इस्लामिक सहकार्य संघटना — लाहोर, पाकिस्तान येथे झालेल्या शिखर परिषदेत ३७ देश आणि २२ राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख सहभागी होऊन बांगलादेश देशाला मान्यता दिली.
१९७८: यशवंत विष्णू चंद्रचूड — यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
१९७९: सेंट लुसिया — देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
२०११: न्यूझीलंड — देशातील दुसरा सर्वात भयंकर भूकंप क्राइस्टचर्चमध्ये झाला.
जन्म :
१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन — अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१८३६: महेशचंद्र भट्टाचार्य — भारतीय विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञ
१८५७: रॉबर्ट बॅडेन-पॉवेल — पहिले बॅरन बॅडन-पॉवेल, इंग्लिश जनरल, स्काउट असोसिएशनचे सहसंस्थापक
१८५७: हेन्री रिच हर्ट्झ — जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
१८८९: ओलाव्ह बॅडेन-पॉवेल — बॅरोनेस बॅडेन-पॉवेल, इंग्लिश स्काउट लीडर, पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक
१९०८: रोमुलो बेटान्कोर्ट — व्हेनेझुएला देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष
१९१४: रेनाटो दुल्बेको — इटालियन-अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ — नोबेल पारितोषिक
१९२०: इफ्तिखार — भारतीय चरित्र अभिनेते
१९२१: जीन-बेडेल बोकासा — मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकचे २रे अध्यक्ष (निधन: ३ नोव्हेंबर १९९६ )
१९२२: व्ही. जी. जोग — भारतीय व्हायोलिनवादक
१९२८: क्लेरेन्स 13X — अमेरिकन धार्मिक नेता, नेशन ऑफ गॉड्स अँड अर्थ्सचे संस्थापक
१९३६: जे. मायकेल बिशप — अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
१९४१: हिपोलिटो मेजिया — डॉमिनिकन रिपब्लिक देशाचे ५२वे अध्यक्ष
१९४३: हॉर्स्ट कोहलर — जर्मनी देशाचे ९वे अध्यक्ष
१९५२: सौफातु सोपोआंगा — तुवालु देशाचे ८वे पंतप्रधान
१९६४: एड बून — अमेरिकन व्हिडिओ गेम प्रोग्रामर, मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते
१९७५: ड्रिव बॅरीमोर — अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माते
१९८३: तारका रत्न — भारतीय अभिनेते
जागतिक दिन :
जागतिक विचार दिन
हा दिवस जागतिक स्तरावर Girl Guides आणि Girl Scouts चळवळीशी संबंधित आहे.
२२ फेब्रुवारी हा लॉर्ड रॉबर्ट बॅडेन पॉवेल (स्काउट चळवळीचे संस्थापक) आणि ओलेव्ह बॅडेन पॉवेल (पहिल्या जागतिक मुख्य मार्गदर्शक) यांचा संयुक्त जन्मदिन आहे.
१९२६ पासून हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी जगभरातील मार्गदर्शिका व स्काउट्स जागतिक बंधुता, मैत्री आणि सामाजिक सेवा यांचा संकल्प करतात.
🧪 National Science Day (अमेरिका – George Washington’s Birthday संदर्भात)
(टीप: भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारीला साजरा केला जातो.)
🇱🇨 Saint Lucia Independence Day
२२ फेब्रुवारी १९७९ रोजी Saint Lucia या कॅरिबियन देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
त्यामुळे हा दिवस त्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
🇺🇸 ऐतिहासिक संदर्भ
२२ फेब्रुवारी हा George Washington (अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष) यांचा जन्मदिन आहे.
अमेरिकेत हा दिवस “Presidents’ Day” आठवड्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो.