३ मार्च महत्वाच्या घटना
१५७५: तुकारोची लढाई – मुघल सम्राट अकबरने बंगालचा सुलतान दाऊद खान करानीच्या सैन्याचा पराभव केला.
१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.
१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१८९१: शोशोन नॅशनल फॉरेस्ट, अमेरिका – जगातील पहिले राष्ट्रीय वनउद्यान सुरु झाले.
१९३१: अमेरिका – देशाने स्टार-स्पॅंगल्ड बॅनरचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केले.
१९१८: ब्रेस्ट-लिटोव्हस्कचा करार – पहिल्या महायुद्धातून माघार घेण्यास मान्य करण्यासाठी रशियाने या करार स्वाक्षरी केली.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९३०: नाशिक येथील काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
१९४५: दुसरे महायुद्ध – खराब हवामानामुळे कमी दिसत असल्यामुळे इंग्लंडच्या आरएएफ ने चुकून नेदरलँड्सच्या हेगमधील बेझुइडेनहाऊट भागात बॉम्बफेक केली.
१९५८: नुरी अल-सैद – हे आठव्यांदा इराकचे पंतप्रधान बनले.
१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.
१९६९: अपोलो प्रोग्राम – नासाने चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी अपोलो ९ लाँच केले.
१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.
१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.
१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.
२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या शरदच्चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
२००५: मार्गारेट विल्सन – यांची न्यूझीलंड हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षपदी निवड झाली. कोणत्याही देशाच्या सर्व सर्वोच्च राजकीय कार्यालयांमध्ये महिलांची नियुक्ती झाल्याची पहिली घटना.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१७: निन्टेन्डो स्विच – जगभरात विक्रीसाठी सुरु झाले.
३ मार्च जन्म
१८२५: जपानी सुमो पैलवान, ११वे योकोझुना – शिरानुई कोमोन शिरानुई कोमोन
१८३१: अमेरिकन व्यापारी, पुलमन कंपनीचे संस्थापक – जॉर्ज पुलमन
१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म.
१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म.
१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म.
१८९५: नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक – रॅगनार फ्रिश
१९१८: अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक – आर्थर कॉर्नबर्ग
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.
१९२४: टोमिची मुरायामा – जपान देशाचे ५२वे पंतप्रधान
१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म.
१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.
१९३०: आयन इलिस्कू – रोमानिया देशाचे अध्यक्ष
१९३५: बल्गेरिया देशाचे २रे अध्यक्ष – झेलु झेलेव
१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म.
१९४०: अमेरिकन फॅशन डिझायनर, पेरी एलिस कंपनीचे संस्थापक – पेरी एलिस
१९४८: अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते – स्टीव्ह विल्हाइट
१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म.
१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.
३ मार्च जागतिक दिन
‘जागतिक वन्यजीव दिन’ : हा आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवांना समर्पित असतो. हा वार्षिक उपक्रम अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण तो धोक्यात आलेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती व प्राण्यांविषयी जनजागृती निर्माण करतो.